22 April 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Petrol Diesel Price Hike | सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ सुरूच

Petrol Diesel Price hike

मुंबई, ०७ ऑक्टोबर | पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून इंधनाची दरवाढ थांबता थांबेना, असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price Hike) वाढ झाली आहे. या नव्या वाढीसह डिझेल दरवाढीचा आजपर्यंत प्रति लिटरचा सर्वात मोठा आकडा गाठला आहे. डिझेलने एकप्रकारे शतक गाठले असून दिल्लीत आज डिझेलचे दर 99.55 रुपये म्हणजेच 100 रुपये लिटर एवढे झाले आहे. तर, पेट्रोल 109.25 रुपयांवर पोहोचले.

Petrol Diesel Price Hike. With the new hike, diesel price hike has reached the highest figure per liter to date. Diesel has somehow reached a century and today in Delhi, the price of diesel is Rs 99.55 or Rs 100 per liter. So, petrol reached Rs 109.25 :

कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल ८० डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटाच लावला आहे. गेल्या सलग चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल २.५३ रुपयांनी तर, गेल्या पाच दिवसांत पेट्रोल १.५० रुपयांनी महागले आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढून 103.24 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. तर, डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ होवून 91.77 वर पोहोचले आहेत. इकडे मुंबईत डिझेलने शंभरी गाठल्याचे दिसून येते, आज डिझेलच्या दरात 38 पैशांची वाढ होवून प्रतिलिटर रुपये 99.55 पर्यंत पोहोचले आहे. तर, पेट्रोलच्या दरात 29 पैशांची वाढ होवून ते 109.25 रुपयांवर पोहोचले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Petrol Diesel Price hike by 25 and 30 Paise respectively today new rates in India.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या