21 November 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Sindhudurg Airport | सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाचे सुरक्षित ‘टेस्ट लँन्डिग’

Sindhudurg Airport

सिधुदुर्ग, ०७ ऑक्टोबर | वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पावर बुधवारी गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ (Sindhudurg Airport) असा 24 मिनिटाचा अलायन्स एअरच्या विमानाने सुरक्षित प्रवास केरून ‘टेस्ट लँन्डिंग’ यशस्वी केले. आता विमानतळ लोकार्पण सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असल्याने तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा त्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.

Sindhudurg Airport On Wednesday, a 24-minute Alliance Air flight from Goa to Sindhudurg Airport made a safe landing at the Sindhudurg Airport project at Chipi-Parule in Vengurle taluka :

तब्बल वीस वर्षानंतर सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे आता शनिवार दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी, आयआरबी आणि विमान कंपनीने नियोजन सुरू केले आहे. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच गोवा ते सिंधुदुर्ग असा अलायन्स एअरच्या विमानाने अवघ्या 24 मिनिटाचा प्रवास केला. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाफ विमानासोबत होता. यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. त्यानंतर एका तासाने अलायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ घेत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा – Titan Share Price | बिग बुल राकेश झुनझूनवालांचा खास शेअर Titan तुफान तेजीत | गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर

2018 मध्ये त्यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री असेलेले सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना अशाच प्रकारे गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मूर्ती घेऊन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभूही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पुर्ण नसल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमानतळास परवानगी मिळाली नव्हती. आता विमानतळाचे काम पुर्ण झाल्याने डिजीसीएकडून सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी विमानाचे टेस्ट लँन्डिंग यशस्वी पार पडले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा – Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status | तुम्ही घरबसल्या IPO अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sindhudurg Airport Test Landing successfully done.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x