Arbaaz Merchant Alleges NCB | NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवली | CCTV'त दिसेल | अरबाझचा आरोप
मुंबई, ०७ ऑक्टोबर | ड्रग्ज पार्टीचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतं आहे. मुंबईतल्या क्रूझवर टाकण्यात आलेल्या NCB च्या छाप्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट या दोघांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अशात आता अरबाझ मर्चंट याने जामिनासाठी अर्ज केला असून एनसीबीनेच क्रूझवर ड्रग्ज ठेवले असा (Arbaaz Merchant Alleges NCB) आरोप केला आहे. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यात ही बाब दिसून येईल असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Arbaaz Merchant Alleges NCB. Arbaaz Merchant has applied for bail, alleging that the NCB had placed drugs on the cruise. Not only that, check the CCTV footage and it will show the matter :
अरबाझ मर्चंटनं बुधवारी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यासोबतच अरबाझने मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इंटरनॅशनल टर्मिनलच्या ग्रीन गेटवरचं CCTV फुटेज देण्याची देखील मागणी केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंतचं सीसीटीव्ही फूटेज मिळावं, अशी मागणी अरबाझ मर्चंटनं केली आहे. तसेच, सीआयएसएफनं त्याची एक कॉपी ठेवावी, असं देखील अरबाझ मर्चंट म्हणाला आहे.
हे सुद्धा वाचा – Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १०% हुन अधिकची उसळी | गुंतवणूकदार मालामाल
अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी एनसीबीला सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. अरबाझ मर्चंटनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय की, ‘सीसीटीव्हीमधून हे दिसून येईल की प्रवेश करताना माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत आणि ते एनसीबीनंच तिथे प्लांट केले होते’
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Arbaaz Merchant Alleges NCB that NCB officers placed drugs on the cruise.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार