22 November 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Maharashtra Bandh | 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक

Maharashtra Bandh

मुंबई, 0९ ऑक्टोबर | 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक महाविकास आघाडीने दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी भाजपवर केला. दरम्यान, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

Maharashtra Bandh. Mahavikas Aghadi has called for a Maharashtra Bandh on October 11. This information was given by the leaders of the alliance at a joint press conference. The press conference was attended by Shiv Sena MP Sanjay Raut, NCP leaders and Nawab Malik and Sachin Sawant :

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या बंदात महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली. या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात येणार आहे. तसंच या बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे, असंही ते म्हणाले. तसंच हा बंद 100 टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक म्हणाले की, लखीमपूरमध्ये इतका मोठा गुन्हा घडूनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. शेतकऱ्याची हत्या करणारा मंत्र्याचा मुलगा फरार आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष लोटले तरी केंद्र सरकार त्यांच्याशी संवाद साधत नसून त्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हटले जात आहे. भाजप शेतकऱ्यांचे हित पाहणारा पक्ष नसून तो शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. आता तर भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीकाही नवाब मलिक यांनी केली.

शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडणे ही मानवतेला कलंक लावणारी घटना आहे आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीला कलंकीत करणारे आहे,” असे सचिन सावंत म्हणाले. ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना अडवण्यात आले ते पाहता देशात हुकुमशाही आली आहे, असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दमनशाही केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh on 11 October Mahavikas Aghadi press conference.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x