22 November 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Crime Branch Notice To Parambir Singh | परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने धाडली नोटीस

Crime Branch Notice To Parambir Singh

मुंबई, 0९ ऑक्टोबर | मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर (Crime Branch Notice To Parambir Singh) राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली आहे. एक टीम हरियाणा या ठिकाणीही नोटीस देण्यासाठी गेली आहे. या नोटीसच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना 12 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Crime Branch Notice To Parambir Singh. The Mumbai Police Crime Branch has issued a notice to former Mumbai Police Commissioner Parambir Singh to appear for questioning. Goregaon police station has registered ransom cases against Parambir Singh, Sachin Waze and others :

सेवा नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाअंतर्गत राज्य सरकारने परमबीर सिंह यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही या नोटीस संदर्भात त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच ते नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीही माहिती नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त नेमके गेलेत कुठे याचा आता कसून शोध राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे.

परमबीर सिंह देशाबाहेर गेले आहेत, अशा बातम्या बाहेर येत आहेत. या प्रकरणावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, या प्रकरणावर केंद्रीय गृह मंत्रालयाशी बोलणे सुरू असून, परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सिंह हे सरकारी अधिकारी असल्याने, जर त्यांना कुठेही जायचे असेल तर ते सरकारच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही, असे असूनही, जर ते देशाबाहेर गेले असतील तर ही चांगली गोष्ट नाही. महाराष्ट्र सरकार त्यांना शोधत आहे. त्यानंतर काय करायचे ते ठरवले जाईल. त्यांच्याविरोधात विविध विभागीय कारवाई केली जाईल, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रथम आपल्या कर्तव्यावर परत यावे आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Crime Branch Notice To Parambir Singh after FIR registered in extortion cases.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x