22 November 2024 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Maharashtra Bandh | पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा | दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद

Maharashtra Bandh

मुंबई, 11 ऑक्टोबर | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी (Maharashtra Bandh) आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.

Maharashtra Bandh. Pune Traders today took a step back and declared their support for the Maharashtra Bandh, which was called by the Mahavikas Aghadi against the atrocities against farmers. This information was given by the Federation of Traders on Monday :

महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवा, त्यानंतर उघडली तरी चालतील, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजेनंतर दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद राहणार आहेत. तसा निर्णय पीएमपीएल प्रशासने घेतला आहे. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धावणाऱ्या बसेस दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे 1400 बसेस आज बंद राहणार आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh Pune traders support to farmers over Maharashtra Bandh.

हॅशटॅग्स

#MaharashtraBandh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x