21 November 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

Maharashtra Bandh | आज 'महाराष्ट्र बंद' | काय सुरु आणि काय असणार बंद?

Maharashtra Bandh

मुंबई, 11 ऑक्टोबर | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे.

Maharashtra Bandh. All the three parties in the Maharashtra Mahavikas Aghadi government have called for a Maharashtra bandh on October 11 to protest the killing of farmers at Lakhimpur Kheri in Uttar Pradesh :

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ताधारी आघाडी असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये पूर्ण शक्तीने सहभागी होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले होते की, ‘केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात लोकांना जागृत करणे आवश्यक आहे. शेतकरी या लढ्यात एकटे नाहीत आणि त्यांच्यासोबत एकता दाखवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रापासून सुरू झाली पाहिजे.’

पाहा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नेमकं काय सुरु असणार
* हॉस्पिटल
* रेल्वे
* बस
* लोकल ट्रेन
* किराणा
* भाजीपाला
* दूध विक्री

या जीवनावश्यक गोष्टी या ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनादरम्यान देखील सुरु राहणार आहेत. त्यामुळे सामन्यांना फारशा अडचणी येणार नाही.महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या गोष्टी बंद राहणार आहेत. यावेळी बंदचा निषेध करण्यासाठी पाहा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नेमकं काय सुरु असणार

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद राहणार आहे. बाजार समिती ही अत्यावश्यक सेवेत असली तरी शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत हा बंद पाळण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड व्यापारी संघटनेने सोमवारी सर्व फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार बंद राहतील असे जाहीर केले आहे. व्यापारी संघटनेनेही सर्व सदस्यांना सोमवारी आपला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन सोमवारी बाजारात आणू नये असे आवाहन केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh over Lakhimpur Kheri violence called by MahaVikas Aghadi.

हॅशटॅग्स

#MaharashtraBandh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x