22 November 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Maharashtra Bandh | मुंबईत भाजपचे आमदार-खासदार असलेल्या भागातही बंद यशस्वी | व्यापारी ते सामान्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

Maharashtra Bandh

मुंबई, 11 ऑक्टोबर | उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे अमानुष हत्याकांड, वाढती महागाई शेतकरी विरोधी कायदे याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आज सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे. या बंदला भाजपाने विरोध केला होता. मात्र त्यांतरही भाजपाच्या गड असलेल्या घाटकोपरमध्ये बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Maharashtra Bandh. BJP MLA Parag Shah from Ghatkopar East and Ram Kadam from Ghatkopar West are the two BJP MLAs. While the BJP opposed the bandh, the bandh got success in the constituencies of both the MLAs :

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी मध्ये शेतकरी शांततापूर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. परंतू केंद्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू. या विरोधात केंद्र सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात असून या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला आहे.

राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना सहभागी झाल्याने बंद यशस्वी होतो, असा इतिहास आहे. यामुळे मुंबईत 100 टक्के बंद दिसून येत आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत. बेस्टच्या 8 बसेसवर दगडफेक झाल्याने काही तुरळक बसेस चालवल्या जात आहेत.

महाविकास आघाडी सरकारने जो बंद पाळला आहे त्याला राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या विरोधानंतरही त्यांचा गड मानल्या जाणाऱ्या विभागात बंद पाळला गेला आहे. घाटकोपर पूर्वेला पराग शाह तर घाटकोपर पश्चिमेला राम कदम हे भाजपाचे दोन आमदार आहेत. भाजपाने बंदला विरोध केला असताना या दोन्ही आमदारांच्या विभागात बंद पाळण्यात आला. यामुळे भाजपाच्या गडातही बंद यशस्वी झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh got success in the constituencies of Mumbai BJP MLAs.

हॅशटॅग्स

#MaharashtraBandh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x