26 December 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा
x

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital | कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीत टोकन गुंतवणूक करण्याची शक्यता

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital

मुंबई, 12 ऑक्टोबर | सध्या व्होडाफोन-आयडिया ही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारच्या निर्णयामुळे कंपनीला दिलासा मिळाला असला तरी कंपनीसमोरील आव्हानं मात्र संपलेली नाहीत. व्होडाफोन आयडियाचं बाजारातील अस्थित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये अधिक पैसा गुंतवण्याची गरज आहे. दरम्यान, कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीतील आपला विश्वास वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा भरवसा वाढवण्यासाठी टोकन गुंतवणूक ((Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital) करण्याची शक्यता आहे.

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital. Aditya Birla Group chairman and billionaire Kumar Mangalam Birla is expected to infuse a token sum of less than ₹1,000 crore into Vodafone Idea :

मनीकंट्रोलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुमार बिर्ला कंपनीमध्ये १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करू शकता. व्होडाफोन आयडियाला सरकारच्या निर्णयानंतर मिळालेल्या दिलास्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत प्रमोटर बिर्ला यांच्याकडून गुंतवणूक झाल्यावर अन्य गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास वाढेल आणि ते संकटाचा सामना करणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी पुढे येऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मनीकंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये प्रमोटर व्होडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने १० हजार कोटी रुपये इतकी मोठी रक्कम गुंतवण्यासाठी सरकार आणि Vodafone-Idea (Vi) यांच्यात कोणताही करार झालेला नाही. यापूर्वी बिर्ला यांनी व्होडाफोन आयडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु दूरसंचार क्षेत्रासाठी मदतीसाठी सरकारचं मन वळवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोकन गुंतवणूक बिर्ला समूहाच्या कोणत्या लिस्टेड कंपनीद्वारे होऊ शकते. परंतु कुमार मंगलम बिर्ला ही गुंतवणूक आपलं स्वामित्व असलेल्या कोणत्याही कंपनीद्वारे वैयक्तीक स्वरूपात करू शकतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital a token sum of less than 1000 crore into company.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x