Dhammachakra Pravartan Din 2021 | जाणून घ्या बौद्ध धर्मियांसाठी खास असणार्या या सणाविषयी
मुंबई, १४ ऑक्टोबर | बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2021). दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा आणि विजया दशमी दिवशी साजरा करतात. यंदा दसरा अर्थात विजया दशमी 15 ऑक्टोबरला असल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 आणि 15 ऑक्टोबरला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन सेलिब्रेशन साठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात प्रार्थनास्थळं खुली झाली असली तरीही सामुहिक स्वरूपात धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा सलग दुसर्या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमीवर सामुदायिक स्वरूपात साजरा केला जाणार नाही.
Dhamma Chakra Pravartan Din 2021. One of the important festivals of Buddhists is Dhamma Chakra Pravartan Din. Every year Bhima followers celebrate this festival on 14th October or and Vijaya Dashami. This year Dussehra i.e. Vijaya Dashami is on 15th October so Dhamma Chakra Pravartan Day is on 14th and 15th October :
काय आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्त्व:
बौद्ध धर्मीयांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.
दरम्यान मागील दोन वर्षांपासून कोविड 19 नियमावलीचं पालन करत गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणूनच मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम जनसामान्यांसाठी खुला नसेल. मात्र ऑनलाईन स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं, भीम अनुयायींना देखील कोविड चे नियम पाळत सुरक्षितपणे हा सण साजरा करण्याचं आवाहन आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Dhamma Chakra Pravartan Din 2021 important festivals of Buddhists community.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार