22 November 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Nokia XR20 With Military Grade Build | नोकियाचा पहिला 5G फोन भारतात लाँच

Nokia XR20 With Military Grade Build

मुंबई, १८ ऑक्टोबर | नोकियाने आपला पहिला 5G स्मार्टफोन Nokia XR20 ऑगस्ट महिन्यात टीज केला होता. त्यानंतर हा मोबाईल फोन नोकिया इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला होता आणि येत्या काही दिवसांत हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. Nokia XR20 आज भारतात लॉन्च (Nokia XR20 With Military Grade Build) झाला आहे. नवीन नोकिया फोन मिलिटरी-ग्रेड डिझाइनसह उपलब्ध करून देण्यात आला आहे, जो 55-डिग्री ते 20-डिग्री सेल्सिअस, 1.8-मीटर पाण्याखाली एक तासापर्यंत त्या तापमानात टिकून राहू शकतो.

Nokia XR20 With Military Grade Build. Nokia XR20 was launched in India on Monday. The new Nokia phone comes with a military-grade design that is touted to survive in extreme temperatures ranging from 55-degrees to 20-degrees Celsius, 1.8-metre drops, and for one hour under water :

Nokia XR20 5G ची वैशिष्ट्ये:
Nokia XR20 5G एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मार्टफोन आहे. हा उंचावरून पडून देखील सुरक्षित राहू शकतो. यात IP68 वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्ससह स्क्रॅच रेजिस्टन्स, ड्रॉप रेजिस्टन्स आणि टेम्परेचर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. यामुळे या स्मार्टफोनला कोणतेही बॅक कव्हर किंवा स्क्रीन गार्ड लावण्याची गरज नाही.

Nokia XR20 5G चे स्पेसिफिकेशन्स
Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो. पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Nokia XR20 With Military Grade Build launched in India checkout price updates.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x