27 April 2025 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Guru Maa Kanchangiri Meet Raj Thackeray | राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर प्रेम | युपी-बिहारींनी निश्चिंत राहावं - गुरू माँ कांचनगिरी

Guru Maa Kanchan Giri Meet Raj Thackeray

मुंबई, १८ ऑक्टोबर | माँ कांचनगिरी आणि सूर्याचार्यजी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. सदर भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी प्रसार माध्यमांशी या भेटीबाबत संवाद साधला. त्यावेळी म्हणाल्या की हिंदू राष्ट्राबाबत राज ठाकरे यांच्याशी आज चर्चा झाली. त्यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना अत्यंत (Guru Maa Kanchangiri Meet Raj Thackeray) स्पष्ट आहे. हिंदू राष्ट्राच्या मजबूतीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांना आम्ही केलं असं कांचनगिरी म्हणाल्या.

Guru Maa Kanchangiri Meet Raj Thackeray. I talked to Raj Thackeray about what was his opinion about North Indians. But in my discussions with him, I realized that he did not have any hatred towards North Indians. Raj Thackeray loves North Indians :

यावेळी प्रसार माध्यमांनी उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत गुरू माँ कांचनगिरी यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राज ठाकाईंसोबत उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची देखील माहिती दिली. राज ठाकरे यांच्या मनात जे उत्तर भारतीयांबाबत होतं त्याबाबत मी त्यांच्याशी बोलले. पण त्याच्या मनात उत्तर भारतीयांबाबत अजिबात द्वेषभावना नाही हे मला त्यांच्यासोबतच्या चर्चेत जाणवलं. उत्तर भारतीयांवर राज ठाकरेंचं प्रेम आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातून मुंबई आलेल्यांनी निश्चिंत राहावं कारण राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांवरील प्रेम त्यांच्यासोबतच्या चर्चेत मला जाणवलं”, असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या.

राज ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का? असं विचारण्यात आलं असता कांचनगिरी यांनी महत्त्वाचं विधान केलं. “मी हिंदूराष्ट्रासाठी काम करत आले आहे आणि यापुढेही करत राहिन. राजकाराणाबाबत मला माहित नाही. मी साध्वी आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं. कारण देशात सध्या नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवं”, असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या.

राज ठाकरे यांची डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याची इच्छा असल्याचंही कांचनगिरी यांनी सांगितलं. “राज ठाकरे यांचा डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचं अयोध्येत मोठं स्वागत करू, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी हिंदूराष्ट्राच्या मजबूतीसाठी अयोध्या दौरा करायला हवा”, असं कांचनगिरी म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Guru Maa Kanchan Giri Meet Raj Thackeray in Mumbai over Hindu Rashtra issue.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या