19 April 2025 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Kojagiri Purnima 2021 | 19 ऑक्टोंबर | जाणून घ्या शुभ मुहूर्तासह कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्व

Kojagiri Purnima 2021

मुंबई, १९ ऑक्टोबर | भारतीय संस्कृतीत आणि सनातन धर्मात शरद पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. शरद पौर्णिमेच्या दिवसी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या व्यतिरिक्त भगवान विष्णूची पूजा केल्याने आयुष्यातील धनाची कमतरता दूर होते असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून ही संबोधले जाते. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला ही शरद पौर्णिमा असे (Kojagiri Purnima 2021) म्हटले जाते. धार्मिक मान्यतनेनुसार, या दिवशी अवकाशातून अमृताच्या थेंबांचा वर्षाव होतो.

Kojagiri Purnima 2021. Kojagiri Purnima is a special festival in Hinduism which is also known as Kaumadi Purnima. The literal meaning of Kojagiri is the one who is awakened and therefore this special day is also named Jagrit Purnima :

पौराणिक कथेनुसार, देवी लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमेच्या दिवशी अवतार घेऊन आल्या होत्या. असे मानले जाते की दिवाळीपूर्वी या दिवशी देवी लक्ष्मी रात्रीच्या निवासाला जाते. या दिवशी घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे, कारण आई लक्ष्मी केवळ स्वच्छ आणि स्वच्छ घरात प्रवेश करते असं मानलं जातं. यासोबतच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयानंतर रात्रीच्या वेळी पूजा करण्याची प्रथा आहे. या रात्री अष्ट लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला खीर अर्पण केली जाते. खीर एका स्वच्छ कपड्याने भांड्यात बांधून रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावी. सकाळी प्रसादाच्या रूपात घेतल्याने घरात समृद्धी येते. या रात्री आकाश दिवे लावणे देखील शुभ मानले जाते.

कोजागिरी पौर्णिमा ही पश्चिम बंगाल, ओडिशा आणि असाम मध्ये मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. तर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची या दिवशी पूजा करण्यात येते. पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये अशी मान्यता आहे की, मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते. तसेच सुख-समृद्धी लाभते.

हिंदू पंचांगानुसार शरद पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबर, 20 ऑक्टोंबलला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर बुधवारी रात्री 8.20 वाजता समाप्त होईल. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या वेळी महारासची रचना केली होती. तसेच चंद्र देवतेची विशेष पूजा ही केली जाते. रात्री आकाशाच्या खाली खीर किंवा दूध ठेवले जाते. असे मानले जाते की, अमृत वर्षामुळे खीर किंवा दूध हे सुद्धा अमृत समान गोते. शास्रानुसार, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो असे सांगितले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Kojagiri Purnima 2021 on 19 October 2021 Subha Muhurat information.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या