6 January 2025 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

IFFCO'ने द्रवरूप नॅनो युरियाचा शोध लावला | शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? - वाचा सविस्तर

IFFCO liquid Nano urea

नवी दिल्ली, ०२ जून | पिकांच्या वाढीसाठी युरिया महत्वाची कामागिरी बजावत असतो, शेतामध्ये दिवसेंदिवस युरियाचा अधिक वापर होत असल्याने पर्यावरण देखील हानी होत आहे, या गोष्टींचा विचार करून ‘इफ्को’ने शोध लावला आहे, तो म्हणजे द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा. या प्रयोगासाठी त्यांनी सुमारे ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात याचा यशस्वी प्रयोग केला गेला, यशस्वी चाचण्यानंतर याच वर्षापासून ‘नॅनो’च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात होणार आहे.

इफ्को जैव नॅनो तंत्रज्ञान संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या द्रवरूप ‘नॅनो’ युरिया जगातील पहिला उपक्रम आहे. देशातील काही राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे हे तेही यशस्वीरित्या द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा प्रयोग यशस्वी झाला, अर्धा लिटर नॅनो युरियाची किंमत २४० रुपये ठेवण्यात आली आहे.

या युरिया असे वैशिष्ट्य आहे की, अर्धा लिटर नॅनो युरियात ४० हजार पीपीएम इतके नायट्रोजन टाकले आहे, त्याचप्रमाणे दाणेदार युरियापेक्षा १० टक्क्यांनी नॅनो युरिया स्वस्त आहे व जेवढे 50 किलो च्या गोणी मधून पिकांना मिळणारे नत्र मिळते तितके नत्र अर्धा लिटर नॅनो युरिया मध्ये समाविष्ट केले आहे.

इफ्कोच्या सहकारी खत विक्री संस्थांमधून तसेच www.iffcobazar.in वर ऑनलाइन नॅनो युरियाची विक्री केली जाईल, याकरता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील पुरवण्यात येणार आहे, येत्या दोन महिन्यांत द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा. लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Considering the fact that urea plays an important role in crop growth, the use of urea in the fields is increasing day by day and the environment is also being harmed. For this experiment, they successfully tested it in the fields of about 11,000 farmers. After successful testing, commercial production of ‘Nano’ will start from this year.

News English Title: IFFCO discovery of liquid Nano urea how will this new research benefit farmers news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x