कृषी मंत्र | खरीप कापूस लागवड नियोजनाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
मुंबई, ३० मे | कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती. अक्षय तृतीयेपासून पुढे पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते.
- मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगदी पिक म्हणून कापूस लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येते. हा कल वाढण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे ऊसानंतरचे नगदी पिक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते. कापसाच्या उत्पादनावर पुढील वर्षाचे व्यवहार ठरतात.
- कापसाचे पैसे आले की, लगीनसराई जोरात होते. दैनंदिन व्यवहारामध्ये चलन फिरते राहते. इतर पिकांची उत्पदकता कमी असल्यामुळे व तात्काळ पैसा देणारे पिक असल्यामुळे या पिकाचे महत्त्व मोठे आहे. कापूस पिकाची उत्पादकता कमी येण्याची बरीच कारणे आहेत. त्यामध्ये
- कोरडवाहू क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड
- हलकी, मध्यम, भारी सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करणे
- एकाच क्षेत्रामध्ये अनेक वाणांची लागवड करणे
- सेंद्रिय खतांचा आभाव
- रासायनीक खतांची चुकीची व अवेळी मात्रा देणे
- अंतरमशागत करतांना ती चुकीच्या पध्दतीने करणे
- कीड व रोग नियंत्रण करतांना औषधांची चुकिची निवड
- हवामानात सतत होत असलेले बदल आणि पावसाची अनियमितता
- हेक्टरी झाडांची अपूरी संख्या
- सिंचनाचा अपुरा आणि अयोग्य वापर
- सुक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा अपुरा वापर
यासारख्या गोष्टींमुळे कापूस पिकाची उत्पादकता वरचेवर कमी कमी होतांना दिसून येत आहे. याबरोबरच इतरही घटक त्यास कारणीभुत आहेत. यासाठी काय करता येईल यावर एक अभ्यास बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आला. यामध्ये
- एक गांव एक वाण ही संकल्पना राबवणे.
- फक्त मध्यम ते भारी जमिनीतच कपाशीची लागवड करणे.
- कपाशीची लागवड करतांना जुन्या काळा प्रमाणे सापळा पिकांची लागवड करणे.
- उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे तो कमी करणे.
- बीटी वाणांची लागवड करतांना आता सेंदरी बोंड अळीचे व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे प्रमाण वाढत असल्यामुळे फक्त बीटी-२ वाणांचीच लागवड करणे.
- गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना तंत्रज्ञान देणे.
- एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे
यासारख्या विविध घटकांवर शेतकरी जनजागृतीचे कार्यक्रम राबवणे नितांत गरजेचे झालेले आहे. कापूस लागवड तंत्रज्ञानाबाबत आजूनही बरेच संभ्रम आहेत. ते टाळण्यासाठी या पिकाची खरी गरज काय आहे हे पाहणे संयुक्तीक होईल.
हवामान:
कापूस पिकास संपूर्ण हंगाम कालावधीमध्ये ५०० ते ६०० मीमी पाऊस लागतो. पेरणीच्यावेळी ७५ ते १०० मीमी पाऊस व बियाणे उगवणीसाठी १५ अंश सेल्सिअस तापामानाची आवश्यकता असते. रोप अवस्थेत शारीरीक वाढीसाठी २१ ते २८ अंश सेल्सिअस गरज असते. कपाशीच्या झाडांना फुले येण्याकरिता दिवसाचे २४ ते २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस लागते. रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअसचेवर व दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसचेवर गेल्यास फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढते. यामुळे आपल्या परिसरातील तापमानाच्या त्या त्या कालावधीतील चढ-उतारावर शेतकऱ्यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
जमीनः
कापूस लागवडीसाठी जमीन निवडतांना त्या जमिनीच्या नांवातच ‘Black Cotton Soil’ म्हणजेच ‘काळी कापसाची जमीन’ हा उल्लेख येतो, अशी निवडली गेली पाहिजे. परंतु बागायती कापूस लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, ७ ते ८ पीएच आणि १% पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. मात्र हंगामातील कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. पूर्व हंगामी कापूस लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत असल्यामुळे जास्त हलक्या जमिनीमध्ये किंवा खोल काळीच्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास पाणी व्यवस्थापनामध्ये अडचणी निर्माण होवू शकतात. म्हणून जमिनीची योग्य निवड याग्य पद्धतीने होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
जमिनीची पूर्वतयारीः
खोल नांगरट, कुळवाच्या ३-४ पाळ्या देवून जमीन भूसभूशीत करावी. या पिकाच्या मुळ्या खोल जात असल्यामुळे हे करणे आवश्यक आहे.कापूस लागवडीपूर्वी शेवटची पाळी देतांना ती पूर्व-पश्चिम अशीच द्यावी. कारण या पिकाची दाटीची लागवड करतांना ती दक्षिणोत्तर होते. शेवटच्या पाळीपूर्वी एकरी ८-१० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे. कपाशीच्या पऱ्हाटीपासून बायोडायनॅमिक पद्धतीने तयार केलेले खत या पिकास वापरल्यास पिकाची सुक्ष्ममुलद्रव्यांची गरज भागवण्यास मदत होते. कोळपट किंवा न नांगरलेल्या शेतात कपाशीची लागवड करू नये. कारण पाण्याचा किंवा पावसाचा थोडाही ताण पडल्यास अशा जमिनीतील कपाशीचे उत्पादन घटते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नांगरट केलेल्या जमिनीतच शक्यतो कापूस पिकाची लागवड करावी. पूर्वीचे पिक गहू असेल तर उत्तमच. नसता एकरी एक ते दीड ट्रॉली गव्हाचे काड शेतात मिसळल्यास जमिनीला ताणाच्या काळात भेगा पडत नाहीत. पर्यायाने ओल उठण्याचे प्रमाण कमी होते.
लागवडीची वेळः
पूर्व हंगामी कापसाची लागवड करतांना आपण वेळेचा विचार कधी केल्याचे दिसून येत नाही. मग अक्षय तृतीयेपासून ते मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण लागवड करत असतो. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून कपाशीच्या झाडाच्या शरीरशास्त्राचा या ठिकाणी आपण आधार घेणार आहोत.
- काही थोड्या जाती वगळता इतर सर्व जातींमध्ये कपाशीच्या झाडास लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांत पाते, ५० ते ५५ दिवसांत फुले, ९० दिवसांत बोंडे तयार होणे आणि १२० दिवसांत बोंडे फुटून कापूस वेचणीस येतो. जर १ ते १० मे या काळात कपाशीची लागवड केल्यास त्याची बोंडे फुटण्याची अवस्था ही साधारणपणे १ ते १० सप्टेंबर दरम्यान येते.
- मराठवाडा व विदर्भ भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर हे हमखास पावसाचे महिने म्हणून गणले जातात. त्यातल्या त्यात मराठवाडा विभागात परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणावर येतो हे नक्की. मग यावेळी एकतर पावसामुळे बोंडे सडण्यास सुरूवात होते. फुटलेली बोंडे पावसात सापडल्यामुळे मोठे नुकसान होते आणि सुरूवातीस लागलेली चांगली व मोठी बोंडे खराब झाल्यामुळे उत्पादनावर फार मोठा परिणाम संभवतो. म्हणून पूर्व हंगामी कपाशीची लागवड २० मे नंतरच करावी. त्या अगोदर करू नये.
News English Summary: Cotton is the second most important cash crop in the state and in 2012-13 the area under it was 35% of the total area of the country (41.46 lakh hectares). However, the yield per hectare of cotton cotton (496 kg / ha) is lower than the national productivity (305 kg). Bt covers about 95 per cent of the area in the state. The variety was planted. At least three shifts are given while preparing the land for sowing from Akshaya Tritiya. The last shift is also fixed. This shift is made from south to north. Because kharif sowing is to be done east-west.
News English Title: Maharashtra kharif cotton planting planning Krushi Mantra news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News