15 April 2025 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

शेतकऱ्यांना संधी | २५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५०% सब्सिडी | महिना ३ लाखांपर्यंत कमाई

Start this business

पुणे, ०६ जून | कोरोनाकाळात देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरली आहे आणि त्यात अनेकांवर आर्थिक संकट देखील कोसळलं आहे. त्यामुळे काही स्वतःच करावं म्हटल्यास भलीमोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील पसे नाहीत ही दुसरी अडचण झाली आहे. त्यामुळे अनेकांना नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न पडला आहे.

अशावेळी कमी गुंतवणुकीत काही करता येईल का यासाठी अनेकजण पर्याय शोधत असतात. त्यात इतर कोणत्यातरी मार्गाने आर्थिक मदत सुद्धा झाल्यास म्हणता येईल. त्यामुळे असाच एक मोठा पर्याय म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करणे असंच म्हणता येईल. अशाच एका व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तसेच यासाठी तुम्हाला सरकारकडून ५० टक्के घसघशीत सब्सिडीसुद्धा मिळू शकते. हा व्यवसाय आहे मोत्यांच्या शेतीचा. सध्या मोत्यांच्या शेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, हे जाणून घेऊया.

मोत्यांची शेती सुरू करण्यासाठी एक तलाव, शिंपले (ज्यामध्ये मोती तयार होतात) आणि ट्रेनिंग या तीन वस्तूंची गरज असते. यासाठी लागणारे तलाव तुम्ही स्वत: खोदू शकता. तसेच यासाठी ५० टक्के सब्सिडी देते त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. सीप भारतातील अनेक राज्यांत सापडतात. मात्र दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील शिंपल्यां दर्जा चांगला असतो. याची ट्रेनिंग भारातातील अनेक संस्थांमधून दिले जाते. मध्य प्रदेशमधील होशंगाबाद आणि मुंबईमधून मोत्यांच्या शेतीचे ट्रेनिंग घेता येऊ शकते.

सर्वप्रथम शिंपल्यांना एका जाळ्यात बांधून १० ते १५ दिवसांसाठी तलावात ठेवले जाते. त्यामुळे ते तिथे त्यांच्या सोईनुसार वातावरणनिर्मिती करतात. त्यानंतर हे शिंपले बाहेर काढून त्यांच्यावर सर्जरी केली जाते. सर्जरीदरम्यान शिंपल्यामध्ये एक पार्टिकल किंवा साचा टाकला जातो. या साच्यावरील कोटिंगनंतर सिंपले लेअर तयार करतात त्याचेच पुढे मोत्यामध्ये रूपांतर होते.

एक शिंपला तयार होण्यामध्ये २५ ते ३५ रुपये खर्च होतो. तर तयार झाल्यानंतर एका शिंपल्यामधून दोन मोती बाहेर येतात. यातील एक मोती हा किमान १२० रुपयांना विकला जातो. जर मोत्याचा दर्जा चांगला असेल तर २०० रुपयांहून अधिक किंमत मिळू शकते. जर तुम्ही एक एकरच्या तलावात २५ हजार शिंपले टाकले तर त्यासाठी तुम्हाला आठ लाख रुपये खर्च करावे लागलीत. समजा यातील काही शिंपले खराब झाले तरी ५० टक्क्यांहून अधिक शिंपले सुरक्षित बाहेर काढता येतात. यामधून वर्षाला ३० लाखांपर्यंतची कमाई सहजपणे होते.

 

News English Summary:  Start this business at 25 thousand government will give 50 percent subsidy to earn up to Rs 3 lakh per month news updates

News English Title: Start this business at 25 thousand government will give 50 percent subsidy to earn up to Rs 3 lakh per month news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या