6 January 2025 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

कृषी मंत्र | आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली? | घ्या जाणून

Krushi Mantra

मुंबई, ३० मे | आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाहीं. पिकामध्यें थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं. बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित. आयसियु मध्ये अॅडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देत जगवावी लागतात.

पेपर मल्चिंग केल्याशिवाय टोमॅटोसारखे पिक येतच नाहीं. भाजीपाला,कडधान्य, डाळिंब,द्राक्ष,ऊस,कापूस,केळी, सारख्या पिकांमध्ये उत्पादनात सातत्य टिकवणे व नवनविन रोगांचा सामना करण्यात शेतकऱ्यांची दमछाक होतेय.

काय चुकतंय ?
आपण एकमुखाने उत्तर द्याल,’ जमिनीचा कस कमी झाला आहे!’ अगदी बरोबर उत्तर आहे. पण आपण कधी विचार केलाय का? की जर शेतकरी प्रत्येक पिकाला सर्व खते, मायक्रोन्युट्रिएन्ट, औषधो व पोषके आवश्यक प्रमाणात टाकतोय तरीही जमिनीचा कस कमीच का होत आहे ? अरे हा ‘कस’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? नेमकी चुक होतेय कोठे ? हा कस म्हणजे काय? कस म्हणजे “काळी कसदार” या शब्दातील कस होय.

जमिनिला हा काळा रंग त्यात असलेल्या सेंद्रिय कर्बामुळे येतो व सेंद्रिय कर्ब म्हणजेच ह्युमस किंवा ओरगॅनिक कार्बन होय. मग आपल्या प्रचलित खत व्यवस्थापन मध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन का होत नाहीं ?
असे प्रश्न उपस्थित होतात. त्यांचे उत्तर समजुन घेण्यासाठी आपल्याला खालिल माहिती उपयुक्त ठरेल.

या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आलेले काही शास्त्रीय ( सायंटिफिक ) तथ्य आपल्या आजपर्यंतच्या मान्यतांना धक्का देणारी आहेत.मित्रहो संशोधनात असे आढळुन आलेले आहे की सजिवांचे (मानव, वनस्पति, प्राणी सर्वच ) संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्यांची गरज असते. ७५ पैकी १६ (१८) मुलद्रव्यांची सामान्यपणे गरज असते.

आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाही. पिकामध्ये थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं म्हणजे पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत काहीना काही रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित. आयसीयुमध्ये ऍडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देऊन जगवावी लागतात.पेपर मल्चिंग केल्याशिवाय टोमॅटोसारखेआणि मिरचीसारखे पिक येतच नाही.

भाजीपाला, कडधान्य, डाळिंब, द्राक्ष, ऊस, कापूस, केळी, सारख्या पिकांमध्ये उत्पादनात सातत्य टिकवणे व नवनविन रोगांचा सामना करण्यात शेतकऱ्यांची दमछाक दिवसेंदिवस होतच चालली आहे. कारण आपल्या पुढील प्रमाणे काही गोष्टी चुकत आहेत.आपण एकमुखाने उत्तर द्याल,जमिनीचा कस कमी झाला आहे.अगदी बरोबर उत्तर आहे.पण आपण कधी विचार केलाय का? की जर शेतकरी प्रत्येक पिकाला सर्व खते, मायक्रोन्युट्रिएन्ट, औषधो व पोषके आवश्यक प्रमाणात टाकतोय तरीही जमिनीचा कस कमीच का होत आहे ? हा कस म्हणजे काय? कस म्हणजे काळी कसदार या शब्दातील कस होय.जमिनिला हा काळा रंग त्यात असलेल्या सेंद्रिय कर्बामुळे येतो व सेंद्रिय कर्ब म्हणजेच ह्युमस किंवा ओरगॅनिक कार्बन होय. संशोधनात असे आढळुन आलेले आहे की सजिवांचे (मानव, वनस्पति, प्राणी सर्वच ) संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्यांची गरज असते. ७५ पैकी १६ (१८) मुलद्रव्यांची सामान्यपणे गरज असते.

  • मायक्रोन्युट्रिएन्ट ( कॅापर ,झिंक, बोरान,फेरस, मँगेनिज, मॅालीब्डेनम व क्लोरिन / निकेल / कोबाल्ट )
  • दुय्यम मूलद्रव्ये-( कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर )
  • मुख्य मुलद्रव्ये-(नायट्रोजन, फॅास्फोरस, पोटॅश ).
  • नैसर्गिक घटक -( कार्बन , ओक्सिजन व हायड्रोजन )

ज्याप्रमाणे साधे निर्जीव सिमेंट काँक्रीट करायचे म्हटले तरी वाळु,खडी प्रमाण घ्यावे लागते त्याप्रमाणे जिवंत वनस्पतिची सुदृढ़ वाढ करण्यासाठी या १६ मुलद्रव्यांचे पोषण ठराविक प्रमाणच लागत असते.म्हणजे आजचा शेतकरी आपला ८५ % खर्च या ६ % पोषणासाठी करतो आहे. आपल्या पुर्वजांनी शेकडो वर्ष शेती करुनहि जमिनिचा कस टिकवुन ठेवला. कारण त्यांचे १००% पोषण हे सेंद्रिय घटकांवर अवलंबुन होते*त्याद्वारे भरपूर ह्युमस उपलब्ध व्हायचा व नैसर्गिक घटकांचेच ( कार्बन ) मोठ्या प्रमाणात पुनर्भरण केले जायचे.आजचा शेतकरी हेच ९४ % चे पोषण निसर्गावर सोडुन देउन नशिबाला दोष देतो आहे.
हा जमिनितील सेंद्रिय कार्बन सुपिक मातितील जिवाणुंच्या उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.

हेच जिवाणू पिकाच्या अपटेक सिस्टमचे प्रमुख शिलेदार आहेत.आपल्या पुर्वजांना हे रहस्य माहित होते. ते जमिनिचा कस ( सेंद्रिय कर्ब ) टिकवुन ठेवत आले व हजारों वर्ष समृद्ध व शाश्वत शेती करत आले.त्यांच्याकडे जमिनिचा कस टिकविण्याचा मार्ग होता तो म्हणजे देशी जनावरांचे वर्षभर साठवलेले कंपोष्ट खत पुर्ण कुजलेले व कसदार चारा खाउन तयार झालेले.आजच्या संकरीत जनावरांच्या शेणात ह्युमस खुप कमी आहे कारण ते जास्तीत जास्त कस शोषुन घेण्यासाठी तयार केलेले आहे त्यामुळे त्यांच्या शेणात चोथाच जास्त असतो.

जो जमिनित गेल्यावर कुजण्याऐवजी सडतोच जास्त, त्यामुळे उपयुक्त बॅक्टेरिया उत्पन्न होण्याऐवजी हानिकारक बुरशांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे आता आपल्याला देशी गाई सोबत घेऊन शेती करावी लागणार तेव्हाच शेती ही आपल्याला साथ देणार. आणि जमिनीची उत्पादकता वाढणार.

 

News English Summary: It is not uncommon to see a crop planted today and it grows vigorously. The crop does not have the slightest immunity. Seeds do not germinate without application of fungicides and seedlings do not stick to the soil. Like patients admitted to the ICU, our crops have to survive by giving timely doses of drugs from before birth.

News English Title: Why the productivity of our farmland is decreasing a day by day Krushi Mantra news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x