22 February 2025 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

आजचे राशीभविष्य | मंगळवार | २२ सप्टेंबर २०२०

Daily Horoscope, Astrology, Janam Kundali, Marathi News ABP Maza

मेष: चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील.

वृषभ: जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.

मिथुन: चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील.

कर्क: मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल.

सिंह: आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील.

कन्या: प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये.

तूळ: बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

वृश्चिक: आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल.

धनू: मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.

मकर: जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ: नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी.

मीन: चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

 

News English Title: Daily Horoscope 22 September 2020 Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x