23 December 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

आजचे राशिभविष्य | सोमवार | १२ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Making

मेष: अति घाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृषभ: हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

मिथुन: दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

कर्क: धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

सिंह: सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

कन्या: स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल. अधिकची कामे अंगावर पडतील.

तूळ: निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

वृश्चिक: नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू: दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

मकर: नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका.

कुंभ: रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

मीन: नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 12 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x