23 January 2025 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

आजचे राशिभविष्य | बुधवार | १४ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष: आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ: घरामध्ये वेळ खर्च होईल. पण त्यातून समाधान मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका.

मिथुन: बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.

कर्क: जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.

सिंह: घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल. प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल.

कन्या: नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.

तूळ: कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल.

वृश्चिक: द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.

धनू: व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. राजकीय सहकार्य लाभू शकेल. रोखीचे व्यवहार सावधानतेने करा.

मकर: जुनी येणी वसूल होतील. मित्रांच्या भेटीचे योग येतील. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.

कुंभ: मित्रांची योग्य पारख करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. उत्तम कार्यशैली वापराल. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा.

मीन: पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 14 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x