23 December 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १६ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठ पडेल.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल. नातेसंबंध दृढ होतील.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 16 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x