23 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

आजचे राशिभविष्य | रविवार | ४ ऑक्टोबर २०२०

Daily Horoscope, Astrology, Kundali Match Making

मेष: नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृषभ: मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये.

मिथुन: अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे. अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता.

कर्क: कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस.

सिंह: चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या: लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा.

तूळ: स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. परिस्थितीचा ताळमेळ साधाल.

वृश्चिक: कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांची गाठ पडेल.

धनू: पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत. मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल.

मकर: जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ: मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. सट्टा, जुगारापासून दूर रहा. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. विनाकारण प्रवास घडेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.

मीन: प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. कौशल्याचा वापर करावा लागेल.

 

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 4 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x