22 February 2025 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Daily Horoscope | घटस्थापनेच्या दिवशी 5 राशींच्या व्यक्तींवर देवीची कृपा

Daily Horoscope

मुंबई, ०७ ऑक्टोबर | आज गुरूवारी तुम्ही जे काम हातात घेणार त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आज घरी पाहुणे येणार. ज्यामुळे कुटुंबात आनंदाच वातावरण आहे. मिथुन राशीच्या लोकांनी (Daily Horoscope) सावधान राहा. त्यांचा आज कुणाशी तरी वाद होण्याची शक्यता.

Daily Horoscope. Daily Horoscope for 7 October 2021 astrology updates. Navratri is the awakening of Adishakti. The goddess is awakened in a nine-night and ten-day festival :

यंदाची नवरात्रीची सुरूवात 7 ऑक्टोबर 2021 पासून होणार आहे. घटस्थापना (Ghatasthapana) केल्यानंतर पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपाची आराधना केली जाते. नवरात्र (Navratri) म्हणजे आदिशक्तीचा जागर आहे. नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या उत्सवामध्ये देवीचा जागर केला जातो. महाराष्ट्रामध्ये नवरात्रीत ‘भोंडला’ खेळला जातो. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली जाते. नवरात्री आणि दांडिया, रास गरबा हे देखील समीकरण आहे. गुजराती पारंपारिक वेषभूषेमध्ये तरूणाई सजून दांडिया आणि रास खेळण्यासाठी एकत्र जमतात. आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असते. निर्मिती आणि नऊ या संख्येचे अतूट नाते आहे. जमिनीत पेरलेले बी नऊ दिवसांनी अंकुरते .चला तर जाणून घेऊया आजचं 12 राशींच भविष्य

मेष : गुरुवार हा तुमच्या कामासाठी चांगला दिवस आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत.

वृषभ : तुमचे वर्तन खूप सौम्य असणार आहे. वागण्यात बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. तुम्ही कामात परिश्रमपूर्वक काम कराल आणि कोणाच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

मिथुन : अनावश्यक आज कोणाशी वाद होईल. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही तंदुरुस्त असाल. शरीरात चपळता येईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येकाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील.

कर्क : गुरुवारी तुमचे भाग्य उत्तम असेल. तुम्ही तुमच्या मित्र आणि परिचितांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी हा चांगला काळ आहे. कामासाठी दिवस उत्कृष्ट असेल.

सिंह : गुरुवारी तुम्हाला कामात चांगले यश मिळणार आहे. तुमची मेहनत आणि नशीब यांचा चांगला मेळ होईल आणि याचा फायदाच होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला स्वतः कार्यक्षेत्रात लाभ मिळतील.

कन्या : आज नशीबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवाल. घरी पाहुण्यांच्या येण्याने आनंदाच वातावरण असणार आहे. आज गुरूंच्या आणि मोठ्या व्यक्तींच्या प्रती कृतज्ञतेची भावना असेल.

तूळ : आज शत्रूंना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. नशीबाची आज साथ मिळेल. मित्रपरिवारासोबत फिरण्याचा बेत आखाल. स्वास्थ उत्तम राहिल.

वृश्चिक : तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुमची कामे सहज पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंधांमध्ये गोडवा येईल. तुमच्या घरी लवकरच शुभ कार्य पूर्ण होईल.

धनू : तुमचा दिवस अधिक चांगल्या प्रकारे सुरू होणार आहे. तुम्ही तुमच्या हातात जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. नेहमी आपला सकारात्मक विचार ठेवा.

मकर : तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला शुभेच्छा मिळतील.

कुंभ : तुम्ही तुमचे प्रत्येक कार्य चपळतेने सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या मदतीमुळे नवीन काही शिकण्याची संधी मिळेल, मनात आनंद दिसून येईल.

मीन : तुम्ही तुमच्या वडिलांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. तुमचा दिवस चांगल्या बातमीने सुरू होणार आहे. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. आपण पैसे देखील वाचवू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Daily Horoscope for 7 October 2021 astrology updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#DailyHoroscope(241)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x