23 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

October 2020 | Numerology Horoscope | ऑक्टोबर महिन्याचे अंक ज्योतिष

October 2020, Monthly numerology horoscope, Daily Horoscope, Match Making

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर : ज्योतिषीय गणना आणि पंचांगानुसार, सप्टेंबर महिना अतिशय अद्भूत आणि विशेष ठरला. नवग्रहांपैकी तब्बल आठ ग्रहांनी आपले चलन बदलत राशीपरिवर्तन केले. शुक्र, बुध, सूर्य मार्गी चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान झाले. गुरु व शनी आपलेच स्वामीत्व असलेल्या अनुक्रमे धनु आणि मकर राशीत मार्गी झाले. मंगळ आपले स्वामीत्व असलेल्या मेष राशीत वक्री झाला. तर राहु आणि केतु वक्री चलनाने अनुक्रमे वृषभ आणि वृश्चिक राशीत विराजमान झाले. याच क्रमात ऑक्टोबर महिन्यातही बहुतांश ग्रह राशीबदल करतील. या ग्रहांच्या स्थितीचा, चलनाचा मूलांकांवरही कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो.

भविष्यकथनामध्ये संख्याशास्त्राच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या अंक ज्योतिषालाही महत्त्व आहे. मूलांक म्हणजे एखादी व्यक्ती महिन्याच्या ज्या तारखेस जन्मली तिच्यापासून मिळणारा अंक. वार्षिक दिनदर्शिकेत ऑक्टोबर हा दहावा महिना येतो. मूलांक एकचा संचालक सूर्य ग्रह मानला जातो. त्यामुळे सूर्याचा प्रभाव आगामी महिनाभर सर्व मूलांकावर कमी-अधिक प्रमाणात दिसून येईल. अन्य मूलांकांचे संचालक ग्रह आणि सूर्याचा त्यांवरील प्रभाव याचाही परिणाम आगामी महिनाभर जाणवेल. ऑक्टोबर महिना कोणत्या मूलाकांच्या व्यक्तींना लाभदायक ठरेल? कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींनी नेमकी काय काळजी घेणे अपेक्षित आहे?

मूलांक १ : यश, प्रगतीकारक महिना:
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, १९, किंवा २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक एक असतो. सूर्य या मूलांकाचा संचालक मानला जातो. ऑक्टोबर महिना मूलांक एक असलेल्या व्यक्तींसाठी सकारात्मक असेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश मिळून प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. सूर्याच्या प्रभावामुळे आत्मबल वाढीस लागेल. विद्यार्थी वर्गासाठी आगामी महिना अनुकूल ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असले, तरी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात छोट्या कुरबुरींना सामोरे जावे लागू शकेल. नोकरदार वर्गाने आवेशाला आवर घालावा. बोलताना तारतम्य बाळगावे. व्यापारी वर्गाला ऑक्टोबर महिना विशेष लाभदायक ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळ अनुकूल असेल. शक्य असल्यास सूर्याला नियमितपणे अर्घ्य द्यावे, असे सांगितले जात आहे.

मूलांक २ : नवीन दिशा देणारा महिना:
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला असेल, तर त्यांचा मूलांक दोन असतो. चंद्र हा मूलांक दोनचा संचालक मानला गेला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सूर्य आणि चंद्र या दोन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. ऑक्टोबर महिन्यात काही मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. याचा भविष्यात आपल्याला भरघोस लाभ घेता येईल. दृढनिश्चयाने या महिन्यातील वाटचाल राहील. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. जुन्या काही समस्या संपुष्टात येऊ शकतील. आगामी काळात जीवनाला नवीन दिशा देणारे प्रसंग घडू शकतील. यामुळे नवीन ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार होईल. नियोजित ध्येयप्राप्ती होण्याचे योग. संसर्गजन्य आजारांपासून बचावाची विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास पौर्णिमा, अमावास्या तसेच सोमवारी खिरीचा नैवेद्य कोणत्याही मंदिरात जाऊन अर्पण करावा, असे सांगितले जात आहे.

मूलांक ३ : मनोबल आणि ज्ञान वाढेल:
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० या तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक तीन असतो. गुरु हा मूलांक तीनचा संचालक मानला गेला आहे. आगामी महिन्यात आपल्यावर प्रामुख्याने गुरु आणि सूर्य या दोन ग्रहांचा प्रभाव राहील. नेतृत्व गुणांमध्ये वाढ होईल. ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांच्या उत्तम अनुकूलतेमुळे मनोबल व ज्ञान या दोन्ही गोष्टीत भर पडेल. नोकरदार वर्गाला ऑक्टोबर महिना दिलासादायक ठरू शकेल. महिन्याच्या उत्तरार्धात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल. विवाहेच्छुक मंडळींना आगामी काळात सकारात्मक वार्ता मिळू शकतील. संसर्गजन्य, कफकारक आजार त्रस्त करू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास नियमितपणे दुर्गा सप्तशती कवच पठण करावे, असे सांगितले जात आहे.

मूलांक ४ : कार्यक्षमता व आत्मविश्वासात वृद्धी:
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ यापैकी तारखेला झाला असेल, तर त्यांचा मूलांक चार असतो. राहु या मूलांकाचा संचालक मानला गेला आहे. राहुचा प्रभाव असणाऱ्या या व्यक्ती रहस्यमयी असतात. ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर राहु आणि सूर्याचा प्रामुख्याने प्रभाव पडेल. खूप जुनी समस्या आगामी काळात संपुष्टात येऊ शकेल. कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. कठोर मेहनत आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीचे रुपांतर अनुकूलतेत करू शकाल. भाग्याची भक्कम साथ ऑक्टोबर महिन्यात लाभेल. एखादी महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात येण्याचे योग. रोजगारासाठीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यशप्राप्तीची शक्यता. वैवाहिक जीवनातील काही मतभेदांमुळे मन खिन्न होऊ शकेल. शक्य असल्यास नियमितपणे तंत्रोक्त देवी सूक्तम पठण करावे, असे सांगितले जात आहे.

मूलांक ५ : उत्तम लाभदायक महिना:
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, किंवा २३ यापैकी एखाद्या तारखेला झाला असेल, तर त्या व्यक्तीचा मूलांक पाच असतो. बुध ग्रहाला मूलांक पाचचे संचालक मानण्यात आले आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर बुध आणि सूर्य ग्रहाचा प्रामुख्याने प्रभाव राहील. त्यामुळे बुधादित्य योगाचे विशेष लाभ मिळू शकतील. आगामी महिन्यात बौद्धिक क्षमतेत कमालीची वाढ झालेली दिसू शकेल. बुद्धीच्या जोरावर कठीण वाटणारी कामे सुलभतेने पार पडतील. यापूर्वी आलेल्या अनुभवांचा आागामी महिन्यात पूरेपूर लाभ करून घेता येईल. परिणामतः एखादे मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव करता येऊ शकेल. संगीत, कला, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना अतिशय अनुकूल कालावधी. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक सुधारणा दिसून येऊ शकतील. भावनाप्रधान व्यक्तींना ऑक्टोबर महिन्याचा उत्तरार्ध त्रासदायक ठरू शकतो. ऑक्टोबर महिन्यात हिरव्या रंगाचा समावेश असलेल्या वस्त्रांचा अधिकाधिक वापर करावा, असे सांगितले जात आहे.

मूलांक ६ : संमिश्र घटनांचा महिना:
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ किंवा २४ यापैकी तारखेला झाला असेल, तर अशा व्यक्तींचा मूलांक सहा असतो. शुक्र ग्रहाला मूलांक सहाचे संचालक मानले गेले आहे. ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर शुक्र आणि सूर्याचा प्रामुख्याने प्रभाव राहील. संवेदनशील व्यक्तींसाठी त्रासदायक काळ. छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन विचलित होऊ शकेल. जुन्या ओळखीतून या आगामी कालावधीत लाभ करून घेता येऊ शकतील. आवेशात येऊन कोणतीही कृती करू नये. अन्यथा सामाजिक आणि आर्थिक पातळीवर नुकसान सहन करावे लागू शकते. मानसिक अस्थिरता आणि द्विधा मनःस्थिती यांमुळे काही समस्या उद्भवू शकतात. मानसिक शांतता भंग होणे शक्य. गुडघेदुखीचा आजार असलेल्यांनी आगामी महिन्यात विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास नियमितपणे श्री सूक्त पठण करावे, असे सांगितले जात आहे.

मूलांक ७ : अखंड सावध असावे:
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६ किंवा २५ यापैकी एका तारखेला झाला असेल, तर अशा व्यक्तींचा मूलांक सात असतो. केतु ग्रह मूलांक सातचा संचालक मानला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर केतु आणि सूर्य या दोन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय आगामी काळात समस्याकारक ठरू शकतील. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अन्यथा मोठे नुकसान संभवते. व्यापारी वर्गाने सावध राहून व्यवहार करावेत. सर्व बाबी तपासून योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचणे हिताचे ठरेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी सामंजस्याने वागल्यास नातेसंबंध दीर्घकाळापर्यंत दृढ होतील. गुडघेदुखीचा आजार असलेल्यांनी ऑक्टोबर महिन्यात विशेष काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. शक्य असल्यास नियमितपणे गायत्री मंत्राचा मानसिक जप करावा, असे सांगितले जात आहे.

मूलांक ८ : महिन्याचा उत्तरार्ध उत्साहवर्धक:
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७ किंवा २६ यापैकी एका तारखेला झाला असेल, तर त्या व्यक्तींचा मूलांक आठ असतो. शनी ग्रह मूलांक आठचा संचालक मानला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर शनी आणि सूर्य ग्रहाचा प्रामुख्याने प्रभाव राहील. या दोन्ही ग्रहांचा विपरीत संयोग मन विचलित करणारा ठरू शकेल. विनाकारण मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. याचा निर्णय क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. महिन्याच्या उत्तरार्धात समस्यांचे निराकरण होऊ शकेल. एखादा विचार नवी दिशा देऊ शकेल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल. कम्प्युटर, सॉफ्टवेअर, व्यवस्थापन क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना यशप्राप्ती होऊ शकेल. शक्य असल्यास दर शनिवारी उपवास करावा, असे सांगितले जात आहे.

मूलांक ९ : भाग्याची भक्कम साथ:
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८ किंवा २७ यापैकी तारखेला झाला असेल, तर त्या व्यक्तींचा मूलांक नऊ असतो. मंगळ ग्रह मूलांक नऊचा संचालक मानला गेला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर मंगळ आणि सूर्याचा प्रामुख्याने प्रभाव राहील. आगामी काळात आत्मबल, पराक्रम यांत वृद्धी होईल. तेज वाढेल. हाती घेतलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्णत्वास जातील. नोकरदार वर्गाने ग्रहांच्या अनुकूलतेचा पूरेपूर लाभ करून घ्यावा. भाग्याची भक्कम साथ मिळू शकेल. मात्र, भविष्याची चिंता ही वर्तमानावर प्रभाव टाकू शकेल. त्यामुळे भविष्याचा विचार सोडून केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहणे हितकारक ठरू शकेल. सांधेदुखी, संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. शक्य असल्यास नियमितपणे हनुमान चालीसा पठण करावी, असे सांगितले जात आहे.

 

News English Summary: According to Numerology, October 2020 is a 5 Universal Month (1 + 0 + 2 + 0 + 2 + 0 = 5). 5 Universal months are always interesting times. Coming midway through the numerological cycle, the 5 stands like a pivot point around which the other numbers spin. This can cause a restless, curious, freedom-loving and adventurous spirit. Under this frequency, we often seek change, variety and anything other than the daily, humdrum lives we most often lead! Yet this kind of monthly energy can be sabotaging, if not kept in check. Avoid throwing the towel in on what you’ve worked SO hard to build up already this cycle! Instead, find ways to let originality, diversity, and difference into your days. The circumstance of what change is “good” change will be different for us all — for some, this 5 energy may feel mighty unsettling. For you sure-footed folk, “trust,” “grace,” and “surrender” are your buzzwords for the month. The changes ushered in by the number 5 will always, ultimately, be in your highest good. October is also a great month to experience life through your 5 senses. As the number of the body, the 5 encourages full embodiment!

News English Title: October 2020 Monthly numerology horoscope prediction astrology Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x