3 January 2025 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

2022 Triumph Tiger 1200 | 2022 ट्रायम्फ टायगर 1200 अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच | पाहा डिटेल्स

2022 Triumph Tiger 1200

2022 Triumph Tiger 1200 | ट्रायम्फ मोटरसायकल्स इंडियाने आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक टायगर १२०० भारतीय बाजारात लाँच केली आहे. नवीन २०२२ ट्रायम्फ टायगर १२०० ही बाईक १९.१९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीत सादर करण्यात आली आहे. ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये खरेदी केली जाऊ शकते, ज्यात प्रो व्हेरिएंट जीटी प्रो आणि रॅली प्रो आणि लाँग रेंज व्हेरिएंट – जीटी एक्सप्लोरर आणि रॅली एक्सप्लोरर यांचा समावेश आहे.

मजबूत अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल पोर्टफोलिओ :
टायगर 1200 बाईक लाँच केल्यानंतर ट्रायम्फकडे आता नऊ बाईक्ससह भारतातील सर्वात मजबूत अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल पोर्टफोलिओ आहे. टायगर अॅडव्हेंचर सीरिजमध्ये आता स्पोर्ट ६६०, ८५० स्पोर्ट, ९०० जीटी, ९०० रॅली प्रो, १२०० जीटी प्रो, १२०० रॅली प्रो, १२०० जीटी एक्स्प्लोरर आणि १२०० रॅली एक्सप्लोरर यांचा समावेश आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

ट्रायम्फ टायगर 1200 च्या वेगवेगळ्या व्हेरिएंटची किंमत :
* टाइगर 1200 जीटी प्रो – 19,19,000 रुपये
* टाइगर 1200 जीटी एक्सप्लोरर – 20,69,000 रुपये
* टाइगर 1200 रॅली प्रो – 20,19,000 रुपये
* टाइगर 1200 रॅली एक्सप्लोरर – 21,69,000 रुपये

ट्रायम्फ टायगर 1200 मध्ये काय खास :
नवीन ट्रायम्फ टायगर १२०० ची जीटी आवृत्ती अधिक रोड-केंद्रित आहे आणि १९/१८-इंच अलॉय-व्हील सेटअप आणि ७.९-इंच सस्पेंशन ट्रिपसह येते. तर रॅली व्हेरियंट्समध्ये स्पोक व्हील्ससह 21/18 इंचाचा सेटअप आणि 8.7 इंच सस्पेंशन ट्रिप मिळते. जीटी आणि रॅली ट्रिम्सच्या एक्स्प्लोरर व्हर्जनमध्ये मोठी, 30 लीटरची फ्युएल टँक आहे, तर प्रो व्हेरिएंटमध्ये 20 लीटरची फ्यूल टँक मिळते.

जुन्या मॉडेलच्या तुलनेत, अनेक महत्त्वाचे अपडेट्स:
नव्या ट्रायम्फ टायगर १२०० बाइकमध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत अनेक महत्त्वाचे अपडेट्स आहेत. उदा., पूर्णपणे पुनर्रचित फ्रंट एंड, ऑफ-रोड हाताळणीत सुधारणा, जुन्या दुहेरी प्रकाश सेटअपच्या जागी एकच एलईडी युनिट आणि पूर्ण-रंगीत टीएफटी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. याशिवाय ट्रायम्फने नवीन टायगर 1200 ला नवा रियर स्विंग आर्म आणि सस्पेन्शन सेटअप दिला आहे, तर या बाईकला बोल्ट-ऑन सबफ्रेम मिळतो. पिलियन फूटपेग देखील बोल्ट-ऑन असतात आणि ते काढून टाकले जाऊ शकतात.

फीचर्स आणि इंजिन :
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये ब्लाइंड स्पॉट रडार, ऑफ रोड आणि ऑफ रोड प्रो, पूर्णपणे कस्टमाइजेबल रायडर मोड, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, हॉट ग्रिप्स, शोआ सेमी अॅक्टिव सस्पेंशनसह अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, २०२२ टायगर १२०० मध्ये ११६० सीसी, टी-प्लेन इंजिन मिळते जे स्लिप असिस्ट क्लचसह ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सच्या मदतीने १४८ बीएचपी आणि १३० एनएमचे टॉर्क जनरेट करते. सर्व प्रकारांना द्वि-दिशात्मक द्रुत-शिफ्टर मिळतो. भारतात नवीन ट्रायम्फ टायगर १२०० ची लढत बीएमडब्ल्यू जीएस १२५०, होंडा आफ्रिका ट्विन आणि डुकाटी मल्टीस्ट्राडा व्ही ४ विरुद्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 2022 Triumph Tiger 1200 launched in India check details 24 May 2022.

हॅशटॅग्स

#2022 Triumph Tiger 1200(1)#Auto(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x