Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News
Highlights:
- Flipkart Sale
- फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल – सर्वच बाइक्सवर 10 टक्क्यांपर्यंत सूट
- Jawa 42
- Bajaj Dominar 250
- बजाज पल्सर NS200
- बजाज पल्सर N250
- हीरो एक्सट्रीम 160R 4V

Flipkart Sale | बाईक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना शोरूममध्ये जाण्याची गरज नाही कारण फ्लिपकार्टने अशा ग्राहकांचे काम सोपे केले आहे. यासोबतच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलही सुरू आहे, ज्यामध्ये अनेक पेट्रोल बाईक जबरदस्त ऑफर्ससह विकल्या जात आहेत. सेलदरम्यान फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना ईएमआय पर्याय, विशेष कूपन आणि क्रेडिट-डेबिट कार्डवर सूट तसेच विविध पेमेंट स्कीम्स सारख्या अनेक शानदार ऑफर्स देत आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल – सर्वच बाइक्सवर 10 टक्क्यांपर्यंत सूट
यंदा फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये जवळपास सर्वच बाइक्सवर 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. प्लॅटफॉर्मवरील सर्वांसाठी काल पासून सुरू झालेल्या सेलमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या टॉप 5 बाइक्सची माहिती येथे आहे, चला पाहूया.
Jawa 42
फ्लिपकार्ट किंमत – 1,85,642 रुपये
जावा येज्दी मोटरसायकल्सने (Jawa Yezdi Motorcycles) नुकतीच फ्लिपकार्टवर आपली बाइक विक्रीसाठी लिस्ट केली आहे. बाईक निर्मात्याच्या प्रॉडक्ट लाइनअपमधील सर्वात स्वस्त मॉडेल जावा 42 आहे, ज्याला नुकतेच अनेक महत्वाचे अपडेट्स मिळाले आहेत. या बाईकमध्ये सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित 294cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 27 bhp पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड गिअरबॉक्स देते.
Bajaj Dominar 250
फ्लिपकार्ट किंमत : 1,85,894 रुपये
फ्लिपकार्टने क्वार्टर लीटर बजाज डोमिनारला मार्केट एक्स-शोरूम किंमतीत लिस्ट केले आहे. डोमिनार 250 मध्ये 250cc, सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड DOHC, 4-व्हॉल्व्ह इंजिन आहे जे 8,500rpm वर 26.6 bhp पॉवर आणि 6,500rpm वर 23.5 एनएम टॉर्क जनरेट करते. या युनिटला 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे जो स्लिप आणि असिस्ट क्लचसह येतो. डोमिनार 250 त्याच्या विलक्षण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखले जाते.
बजाज पल्सर NS200
फ्लिपकार्ट किंमत – 1,61,430 रुपये
बजाज पल्सर NS200 फ्लिपकार्टवर बाजारापेक्षा (एक्स-शोरूम) किंचित जास्त किंमतीत लिस्टेड आहे. मात्र, 20 टक्क्यांपर्यंत किंमत कमी करण्यासाठी ग्राहक विविध ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. बजाज पल्सर NS200 मध्ये सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीबेस्ड 199cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 24 bhp पॉवर आणि 18.74 NM पीक टॉर्क जनरेट करते.
बजाज पल्सर N250
फ्लिपकार्ट किंमत : 1,52,365 रुपये
एनएस 200 प्रमाणेच पल्सर एन 250 ची किंमत मार्केट (एक्स-शोरूम) किमतीपेक्षा थोडी जास्त आहे, परंतु ऑफरवरील विविध सवलतींचा लाभ घेऊन हे कमी केले जाऊ शकते. क्वार्टर लीटर नेकेड रोडस्टरमध्ये ऑइल कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित 249cc इंजिन देण्यात आले आहे जे 24 bhp पॉवर आणि 21.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या युनिटला स्लिप आणि असिस्ट क्लचच्या माध्यमातून पाच स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
हीरो एक्सट्रीम 160R 4V
फ्लिपकार्ट किंमत : 1,28,800 रुपये
हिरो एक्सट्रीम 160R 4V फ्लिपकार्टवर मार्केट एक्स-शोरूम किंमतीएवढ्याच किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या बाईकमध्ये सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड टेक्नॉलॉजीबेस्ड 163.2cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स पर्यायासहित 16.6 bhp पॉवर आणि 14.6 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
Latest Marathi News | Flipkart Sale big billion days sale on festive offer 28 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC