12 January 2025 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Hyundai New Micro SUV | ह्युंदाई भारतात छोटी एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत, सँट्रोची जागा घेणार

Hyundai New Micro SUV

Hyundai New Micro SUV | ह्युंदाईने आपल्या एन्ट्री-लेव्हल कार ह्युंदाई सँट्रोचे उत्पादन बंद केले आहे. ही कंपनी तामिळनाडूतील श्रीपरुंबदूर प्लांटमध्ये या हॅचबॅकची निर्मिती करत असे. बराच काळ भारतात या कारची विक्री खूपच कमी होती आणि त्यामुळे कंपनीने तिचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ह्युंदाई सँट्रो 1998 मध्ये लाँच झाली होती :
ह्युंदाई सँट्रो १९९८ मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती आणि या कारने भारतात कंपनीचा मजबूत ग्राहक वर्ग तयार करण्यात खूप योगदान दिले आहे. मारुतीनंतर ह्युंदाई ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून सुरुवातीच्या काळात भारतीय बाजारात ह्युंदाईच्या यशाचा पाया सँट्रोनेच रचला होता.

कंपनी आणू शकते पंचसारखी मायक्रो एसयूव्ही :
टाटाने काही काळापूर्वी टाटा पंच मायक्रो एसयूव्ही भारतात लाँच केली होती. या कारला भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामुळे इतर कंपन्याही मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये हात आजमावू शकतात. आता भारतात सँट्रो कंपनीच्या पोर्टफोलिओमधून माघार घेत असल्याने ह्युंदाई त्याच्या जागी मायक्रो एसयूव्ही घेऊ शकते.

दक्षिण कोरियात ह्युंदाई कॅस्पर लाँच :
कंपनीने गेल्या वर्षी दक्षिण कोरियात ह्युंदाई कॅस्पर लाँच केली होती. आता असा अंदाज लावला जात आहे की, ह्युंदाई ही कार मायक्रो एसयूव्ही म्हणून भारतात लाँच करू शकते. ह्युंदाईच्या आगामी मायक्रो एसयूव्ही कॅस्परच्या लूक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर याच्या फ्रंटमध्ये सिंगल स्लेट ग्रिल, राउंड शेप हेडलॅम्प तसेच लोअर बंपरमध्ये एलईडी डीआरएल आणि एलईडी रिंग असून कॅस्परमध्ये अधिक प्रोग्रेसिव्ह बंपर, सिल्व्हर फिनिश स्किड प्लेट आणि वाइड एअर डॅमचा वापर करण्यात आला आहे. मात्र भारतात या कारच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hyundai New Micro SUV will be launch soon check details 16 July 2022.

हॅशटॅग्स

#Hyundai New Micro SUV(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x