13 January 2025 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा
x

Hyundai Santro, Grand i10, Aura | कारवर मिळणार 1 लाखांपर्यंत सूट

Hyundai Santro, Grand I10, Aura cars, Auto News

मुंबई, १३ डिसेंबर: निराशाजनक ठरलेलं 2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर मध्ये काही पॉप्युलर कारवर बंपर सूट देत आहे. यामध्ये Maruti Suzuki, Mahindra सह अन्य कंपन्यांसह Hyundai India सुद्धा Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra सारख्या हॅचबॅक आणि सेडान कावर एक लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. अशातच तुम्ही ह्युंदाई या दमदार कारवर कोणहीती कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.

Hyundai Motor Company सर्वाधिक सूट त्यांची प्रीमियम सेडान Hyundai Elantra वर देणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यावर एक लाखांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये 70 हजार रुपयांपर्यंत कॅश बेनिफिट्स आणि 30 हजारांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. ह्युंदाई एलेंट्राच्या मॅन्युअल ट्रान्समिशन वर एक लाख आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 60 हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. भारतात Hyundai Elantra ची किंमत 17.60 लाख रुपये ते 20.65 लाख रुपयांपर्यंत आहे.

Hyundai Santro च्या कारवर 40 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाते. यामध्ये 30 हजारांचा कॅश डिस्काउंटसह 15 हजारांचा एक्सचेंज ऑफर आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट आणि अन्य वेरियंटवर 50 हजारांची सूट दिली जाणार आहे. भारतात Hyundai Santro वर 4.63 लाख रुपये ते 6.31 लाखांपर्यंतच्या किंमती मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Hyundai Grand i10 या पॉप्युलर हॅचबॅकवर कंपनीकडून Year End Sale दरम्यान 60 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये 40 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंटसोबत 15 हजारांचा एक्सचेंज ऑफर आणि 5 हजरांचा कॉर्पोरेट बोनस मिळणार आहे. ह्युंदाई ग्रँन्ड आय10 ची भारतात किंमत 5.91 लाख रुपयांपर्यंत ते 5.99 लाखांपर्यंत आहे.

तसेच Hyundai Aura वर 40 हजार रुपयांपासून ते 70 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये 20 हजार ते 50 हजारापर्यंत कॅश डिस्काउंटसह 15 हजारांचा एक्सेचेंज ऑफर आणि 5 हजारांचा कॉर्पोरेट बोनस मिळणार आहे. भारतात ही कार गेल्या वर्षात लॉन्च केली होती. मात्र सध्या याची किममत 5.58 लाख रुपये ते 9.28 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

News English Summary: There are only a few days left until the end of the year 2020. So companies are offering bumper discounts on some popular cars in December to run out of stock. Hyundai India, along with other companies including Maruti Suzuki, Mahindra, will also offer discounts of up to Rs 1 lakh on hatchbacks and sedan covers like Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura and Elantra. So if you are thinking of buying any car on Hyundai, this is the best opportunity for you.

News English Title: Hyundai Santro Grand I10 Aura cars will get up to 1 lakh rupees discount News updates.

हॅशटॅग्स

#cars(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x