20 January 2025 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Lexus ES 300h Facelift | भारतीय बाजारात Lexus ES300h चे नवीन फेसलिफ्ट मॉडल लाँच

Lexus ES 300h Facelift

मुंबई, 11 ऑक्टोबर | लग्जरी कार उत्पादक कंपनी लेक्सस इंडियाने आपल्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये नवीन ‘बेबी सेडान कार’ची भर घातली आहे. कंपनीने भारतीय बाजारात Lexus ES300h चे नवीन 2021 फेसलिफ्ट मॉडल लाँच केले आहे, ज्याची किंमत ५६.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन Lexus ES300h च्या एक्सटीरियरमध्ये थोडेफार बदल केले आहेत. यासोबतच, कंपनीने कारच्या केबिनमध्ये अतिरिक्त फीचर्स दिले आहे. विशेष म्हणजे आधीपेक्षा नवीन 2021 लेक्सस ES300h च्या किंमतीत फक्त १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीने एक्सक्लुझिव्ह आणि लग्जरी अशा दोन ट्रिममध्ये 2021 लेक्सस ईएस 300 एचला (Lexus ES 300h Facelift) बाजारात आणले आहे.

Lexus ES 300h Facelift. Luxury car maker Lexus India has added a new baby sedan to its Indian portfolio. The company has launched a new 2021 facelift model of Lexus ES300h in the Indian market, priced at Rs 56.65 lakh (ex-showroom) :

नवीन 2021 Lexus ES300h च्या ओवरऑल सिल्हूटमध्ये किरकोळ अपडेट्स:
* कारची डिझाइन आणि स्टाइल नवीन वाटते.
* पुढच्या बाजूला, सिग्नेचर स्पिंडल-शेप्ड फ्रंट ग्रिलला मॅश पॅटर्नसह थोडे रीवाइज्ड केले आहे.
* अलॉय व्हील्सचे डिझाईन देखील पूर्णपणे नवीन आहे.
* कंपनीने अलॉय व्हील्ससाठी दोन रंग पर्याय सादर केले आहेत. या पर्यायांमध्ये सोनिक इरिडियम आणि सोनिक क्रोम यांचा समावेश आहे.
* इंटीरियरमध्ये केबिन आधीप्रमाणेच आहे, पण आता नवीन वॉलनट मटेरियल अपहोल्स्ट्रीचा वापर करण्यात आलाय.
* या कारमध्ये रिक्लाईनिंग आणि व्हेंटिलेटेड रिअर सीट सारखी अनेक लेटेस्ट फीचर्स दिले आहेत.
* कारमध्ये ब्रेक पेडलसाठी विस्तारित पृष्ठभाग, किक सेन्सरसह पॉवर टेलगेट, ३६०-डिग्री कॅमेरा, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह १२.३-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, १७-स्पीकर मार्क लेविन्सन साउंड सिस्टिम आणि एअर प्युरिफायर देखील आहे.

नवीन 2021 Lexus ES300h मध्ये एक स्लोपिंग बोनट दिले आहे, ज्याच्या खाली इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात जुने 2.5-लिटर, चार-सिलिंडर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, ज्यासह कंपनीने 16kWh बॅटरी पॅक देखील वापरला आहे. बॅटरीसह हे इंजिन २१५ बीएचपीची जास्तीत जास्त पॉवर आणि २२१ एनएमची जास्तीत जास्त टॉर्क प्रदान करते. Lexus ES300h ही एक फ्रंट-व्हील-ड्राइव्ह कार आहे आणि ती CVT गिअरबॉक्सशी जुळलेली आहे. भारतात ही कार Toyota Camry ला टक्कर देते, जी ४१.२० लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला विकली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lexus ES 300h Facelift the company has launched a new 2021 facelift model.

हॅशटॅग्स

#Auto(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x