8 January 2025 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
x

Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स

Mahindra XUV400 EV

Mahindra XUV400 EV | साध्या कारपेक्षा इलेक्ट्रिक कारची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बराच तरुण वर्ग इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे मनपसंती दर्शवत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण की महिंद्रा XUV400 EV EV या इलेक्ट्रिक कारच्या राहिलेल्या स्टॉकवर सध्या बंपर ऑफर चालू झाली आहे.

पॉवरट्रेन आणि इंजिन :

महिंद्रा Mahindra XUV400 EV या इलेक्ट्रिक कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला एकूण 2 बॅटरी पॅकअप मिळतो. यामधील पहिली बॅटरी 34.5kWh आणि दुसरी बॅटरी 39.4kWh आहे. समजा तुम्ही या कारला अगदी तंतोतंत चार्जिंग केली म्हणजेच फुल चार्जिंग केली तर ही कार तुम्हाला 375 किलोमीटरपर्यंत रेंज प्रदान करते.

इलेक्ट्रिक कारचे फीचर्स :

महिंद्राच्या या इलेक्ट्रिककारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 10.25 इंच लांबीचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले बसवण्यात आला आहे. तर, महिंद्राच्या या जबरदस्त इलेक्ट्रिक कार मॉडेलचे वायरलेस फोन चार्जिंग आणि सनरूफ देखील अत्यंत कमालीचे आहेत.

त्याचबरोबर तुम्हाला या कारमध्ये एकूण 6 एअरबॅग पाहायला मिळतील. त्याचबरोबर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर पार्किंग कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम देखील दिला गेला आहे. सर्वच फीचर्सने समृद्ध असलेली ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला 16.74 लाख ते 17.69 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Mahindra XUV400 EV प्रो रेंज इलेक्ट्रिक कार :

महिंद्राची ही प्रो रेंज इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या कारनेदेखील चांगली विक्री केली आहे. या कारची शोरूम किंमत 15.49 लाख रुपये आहे. महेंद्राची XUV400 EV प्रो रेंज ही कार 2 वेगवेगळ्या बॅटरीसह येते. ज्यामध्ये EC PRO आणि EL PRO असे दोन बॅटरी पॉवर दिले आहेत. महिंद्राची ही प्रो रेंज इलेक्ट्रिक कार बाजारातील इतर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारबरोबर स्पर्धा करत असते.

Latest Marathi News | Mahindra XUV400 EV Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mahindra XUV400 EV(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x