4 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News

Ola Electric

Ola Electric | सणासुदीच्या काळात ओला इलेक्ट्रिकची चांगलीच हवा पाहायला मिळाली. परंतु गेल्या महिन्याच्या म्हणजेच नोवेंबर महिन्याचा तपशीलानुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे. वाहन पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये केवळ 27,746 व्यक्तींनी वाहनाची नोंदणी करून वाहन खरेदी केले आहे. स्कूटरच्या विक्रीमध्ये 30% टक्क्यांची मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे.

ओला इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीत मोठी घट :

ओला इलेक्ट्रिकसाठी 30% टक्क्यांची मोठी घट अतिशय चिंतेची बाब बनली आहे परंतु ओला इलेक्ट्रिकसाठी या गोष्टी काही नवीन नाहीत. ओला इलेक्ट्रिकमध्ये झालेल्या मोठ्या घटबद्दल तज्ञांचे असे मत आहे की, बाजारात नवनवीन कंपन्यांच्या गाड्यांचे मॉडेल्स येत आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन प्रचंड वाढली. आणि दुसरं म्हणजे ओलाचे प्रोडक्शन आणि सर्विसबद्दल बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. या संपूर्ण समस्यांचे निरासरन कंपनीला 100% करावेच लागेल अन्यथा कंपनी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

इतर कंपन्यांच्या विक्रीत देखील मोठ्या प्रमाणात झाली घट :

अहवालानुसार केवळ ओला कंपनी नाही तर, आणखीनही मोठमोठ्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये टीव्हीएस आणि बजाज यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. सध्या टीव्हीएसने 26,036 एवढेच युनिट्स विकले गेले आहेत जे मागील महिन्याच्या तुलनेत 13% टक्के कमी आहे. परंतु कंपनीचा बाजार हा 21.5 टक्क्यांवरून थेट 23% टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एवढेच नाही तर एथर एनर्जीच्या विक्रीत देखील मोठी घट झाली आहे. यामध्ये 24 टक्क्यांची घट झाली असून फक्त आणि फक्त 12,271 युनिट्स विकले गेले आहेत.

ओलाने नुकत्याच लॉन्च केलेल्या स्कूटरविषयी जाणून घ्या :

ओला इलेक्ट्रिकने नुकतीच स्वतःची दोन वाहने लॉन्च केली आहेत. ज्यामध्ये ( Ola Gig Ola Gig+ Ola S1 Z ) आणि (Ola S1 Z+) या गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार Gig इलेक्ट्रिकल स्कूटरची डिलेवरी 2025 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे तर, S1Z ची सिरीज 2025 च्या मे महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या हक्काची गाडी बुक करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ola Electric 02 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ola Electric(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x