Precautions While Buying A New Car | नवी कार खरेदी करण्यापूर्वी 'या' ५ गोष्टी जाणून घ्या
मुंबई, 12 ऑक्टोबर | सेमीकंडक्टरमुळे कारच्या डिलिव्हरीला विलंब होत आहे. असे असूनदेखील सणासुदीच्या काळात त्यांची मागणी वाढली आहे. आज धकाधकीच्या आयुष्यात कार देखील लोकांची गरज बनली आहे. सुरक्षेच्या बाबतीत, जवळजवळ प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये प्रवास करायचा असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत (Precautions While Buying A New Car) असाल, तर त्याबद्दल तुम्ही घाई करू नये. कार खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात घ्या;
Precautions While Buying A New Car. In case you are buying a new car, this will be very easy for you. All the new car manufacturers are now accepting online bookings for cars. If you are sure about which vehicle you want to purchase :
कार उत्पादक कंपनीची निवड:
जेव्हा आपण पहिली कार खरेदी करतो, तेव्हा कार कंपनीची निवड सर्वात महत्वाची असते, कारण कार खरेदी केल्यानंतर सामान्य माणूस ती सहज बदलू शकत नाही. अशा परिस्थितीत, कार कंपनीची निवड खूप महत्वाची बनते. भारतीय बाजारात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, फोर्ड, किया, फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा, निसान, रेनॉल्टसह अनेक कार कंपन्या आहेत. त्यापैकी मारुती ही सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. त्याच वेळी, दुस-या क्रमांकावर ह्युंदाई आणि नंतर टाटाचे नावयेते.
खरं तर ज्या कंपन्या विक्रीच्या यादीत 5 व्या किंवा त्याखाली आहेत, त्यांच्या कारचा परफॉर्मन्स चांगला नाही, असे मुळीच नाही. ज्या कंपनीची कारविक्री अधिक असते, त्याकडे ग्राहकांचा ओढा अधिक असतो. त्यामुळे तुमच्या आवडीची कंपनी निवडा. तुमच्या आजूबाजूला जे लोक कार वापरतात त्यांचा सल्ला घ्या. तसेच, कारशी संबंधित अनुभव जाणून घ्या.
कार खरेदी करण्याचा उद्देश काय आहे?
कार कंपनीच्या निवडीनंतर, दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार खरेदी करण्याचा उद्देश काय आहे? म्हणजेच, तुम्ही एखाद्या विशिष्ट कामासाठी कार वापरणार आहात का? हे महत्वाचे आहे. कारण बाजारात हॅचबॅक, सेडान, एमपीव्ही, मिड एसयूव्ही आणि एसयूव्ही सेगमेंट कार आहेत. या सर्व कार वेगवेगळ्या उद्देशांसाठी बनवल्या आहेत.
जर तुमच्या कुटुंबात 5 लोक असतील तर हॅचबॅक तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. जर सदस्य 5 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला MPV किंवा 7 सीटर कारच्या दिशेने जावे लागेल. जर तुम्ही खराब रस्ते असलेल्या शहरात रहात असाल तर तुम्हाला एसयूव्ही सेगमेंटची निवड करावी लागले. जर तुम्ही जास्त सामानासह प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सेडान योग्य पर्याय ठरु शकतो.
कारचे बजेट आणि मॉडेल:
जेव्हा कार नेमक्या कोणत्या कारणासाठी खरेदी करायची हे ठरवले जाते, तेव्हा तिसरे काम असते ते म्हणजे कारचे मॉडेल आणि बजेट ठरवणे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला हॅचबॅक कार घ्यायची असेल, असेल तर तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील. समजा तुम्ही मारुतीची हॅचबॅक खरेदी केली तर तुम्हाला ऑल्टो, एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, इग्निस, बलेनो, एस-क्रॉस असे अनेक पर्याय मिळतील. सर्व कार 5 सीटर आहेत, पण किंमतीत खूप फरक आहे. जर तुमचे बजेट 5 लाखांच्या जवळपास असेल तर तुम्ही ऑल्टो, एस-प्रेसो आणि सेलेरियोची निवड करु शकता.
जर तुम्ही तुमच्या बजेटपेक्षा जास्त किंमतीची हॅचबॅक शोधत असाल तर तुम्ही कर्जाची रक्कम वाढवू शकता, पण त्यासाठी कर्जावरील व्याज दर, लोन प्रोसेसिंग फी, हिडन चार्जेस, लोन कोल्जिंग चार्जेस याची सविस्तर माहिती घ्या. तसेच, कर्जाची तुलना करा.
कारचा मायलेज आणि मेंटेनन्स किती आहे:
कार खरेदी करताना सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याचे मायलेज. पेट्रोल कारपेक्षा डिझेल आणि सीएनजीचे मायलेज जास्त असते. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास सारख्याच झाल्या असल्याने डिझेल कार खरेदी करणे शहाणपणाचे मानले जात नाही. याचे कारण म्हणजे डिझेल कारची देखभाल किंमत पेट्रोलपेक्षा जास्त असते. त्याच वेळी, जर तुम्ही सीएनजी कारचा विचार केला तर त्याचे मायलेज चांगले असते, परंतु सीएनजी किटमुळे बूट स्पेस कमी होत असते.
कारचा वार्षिक मेंटेनन्स खर्चाबद्दल देखील माहिती असायला हवी. सध्याच्या काळात कारच्या देखभालीवर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याच वेळी, कंपन्या 5 ते 10 वर्षे कारच्या मेंटेनन्सच्या कॉस्टची यादी जारी करतात.
विमा आणि इतर कागदपत्र:
कार खरेदी करताना विमा सर्वात महत्वाचा आहे. जवळजवळ सर्व कंपन्या त्यांच्या डीलरकडून कार विमा देतात, म्हणून जर तुम्हाला बाहेरून कमी किंमतीत विमा मिळत असेल तर तुम्ही बाहेरून विमा घ्यावा. तसेच, इतर अॅक्सेसरीज आणि कारच्या भागांशी संबंधित गॅरंटी किंवा वॉरंटी पेपर्स घेण्याचे सुनिश्चित करा. उदाहरणार्थ, टायर, स्टीरिओ, बॅटरी इत्यादींवर वेगवेगळ्या वॉरंटी उपलब्ध आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Precautions While Buying A New Car 5 things need to confirm.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS