24 November 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची
x

PURE EV ecoDryft Bike | प्योर ईवी इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज 135 किमी रेंज, कीमत आणि फीचर्स पहा

PURE EV ecoDryft Bike

PURE EV ecoDryft Bike | हैदराबादच्या प्योर ईव्हीने एक नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. दुचाकी उत्पादक कंपनीने इकोड्रिफ्ट इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीदेखील जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्योर ईव्ही इकोड्रायफ्ट ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. बाईकच्या किमतीत दिल्ली सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीचाही समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाईक सिंगल चार्जवर 135 किलोमीटरचा प्रवास करेल. प्योर ईव्हीने सुमारे दोन महिन्यांपूर्वीच या ई-बाइकची टेस्ट राइड ग्राहकांसाठी खुली केली आहे.

बॅटरी आणि रेंज
नवीन प्योर ईव्ही इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाईक मध्ये 3.0 केडब्ल्यूएच बॅटरी आहे. ते एआयएस १५६ प्रमाणित असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचा दावा आहे की इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाईक एकदा चार्ज केल्यावर 135 किलोमीटर चालेल. नव्या ई-बाइकमध्ये ३ किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या कारचा जास्तीत जास्त वेग ताशी ७५ किलोमीटर आहे.

डिझाइन आणि रंग
हैदराबादच्या कंपनीचा दावा आहे की, त्यांनी कामासाठी किंवा इतर कारणांसाठी दररोज ठराविक अंतराचा प्रवास करणाऱ्या लोकांचा विचार करून प्योर ईव्ही इकोड्रायफ्ट ई-बाईक डिझाइन केली आहे. नव्या बाईकमध्ये अँगुलर हेडलॅम्प्स, फाइव्ह स्पोक अलॉय व्हील्स म्हणजेच स्टारसारखी चाके, बसण्यासाठी सिंगल सीट अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनीची ही इलेक्ट्रिक बाइक ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

असं बुकिंग करा आणि मार्च मध्ये डिलिव्हरी
प्योर ईव्हीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित वडेरा यांनी सांगितले की, कंपनीने ही नवीन ई-बाइक टेस्ट ड्राइव्ह गेल्या 2 महिन्यांपासून देशभरातील 100 हून अधिक अधिकृत डीलरशिप सेंटर्सवर उपलब्ध करून दिली आहे. कंपनीकडून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ईव्ही इकोड्रायफ्ट ई-बाईकचे बुकिंगही सुरू झाले आहे. देशभरात कार्यरत असलेल्या सर्व अधिकृत डीलरशिप सेंटरमधून ग्राहक बुकिंग करू शकतात. कंपनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात इकोड्रायफ्ट बाईक खरेदीदारांना (पहिली बॅच) वितरित करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PURE EV ecoDryft Bike price in India check details on 05 February 2023.

हॅशटॅग्स

#PURE EV ecoDryft Bike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x