19 April 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Triton EV Model H Price In India | Triton इलेक्ट्रिक कार भारतात सादर | एका चार्जमध्ये 1200 किमी प्रवास

Triton EV Model H Price In India

मुंबई, १४ ऑक्टोबर | अमेरिकेच्या सुप्रसिद्ध ट्रायटन ईव्हीने भारतात नवी इलेक्ट्रीक कार सादर केल्याने ही कार समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. सादर करण्यात आलेल्या मॉडल एच इलेक्ट्रिक SUV’ची चर्चा होण्याची कारणं देखील तशीच (Triton EV Model H Price In India) आहेत. विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारी ही पहिली कार आहे. Triton Model H ही कार अगदी अमेरिकन एसयुव्ही सारखीच दिसते. त्यात चंकी फ्रंट फेस आणि मोठा ग्रिल देण्यात आला आहे. या कारची लांबी जवळपास 5,690 मिमी, उंची एकूण 2057 मिमी आणि रुंदी 1880 मिमी इतकी आहे. तर याचा व्हिलबेस सुमारे 3,302 मिमी इतका आहे.

Triton EV Model H Price In India. American Triton EV has introduced its new electric car in India. Named the Model H Electric SUV, it is the first car to be launched in India. The Triton Model H looks like an American SUV :

या प्रसिद्ध अमेरिकन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यात एकूण 8 प्रवासी क्षमता आहे. याशिवाय यात 5,663 लीटर क्षमते एवढं सामान ठेवण्यासाठी जागा आहे. ही कार तब्बल सात रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 200kWh बॅटरी हायपरचार्जच्या पर्यायासह देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कार केवळ दोन तासांत पूर्णपणे चार्ज करता येईल. त्यानंतर एकदा चार्ज केल्यानंतर 1200 किमी ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

कंपनीचा हा दावा खरा ठरल्यास इलेक्ट्रिक चार्जवर 1000 किमीची रेंज ओलांडण्यास सक्षम असणारी ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार असेल आणि जागतिक स्तरावरही निश्चितपणे सर्वात जास्त रेंज देणारी EV ठरेल. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणेज भारतातून 2.4 अब्ज डॉलर किंमतीच्या खरेदी ऑर्डर मिळाल्या असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या कारच्या निर्मितीसाठी तेलंगणा येथे एक फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे. ट्रायटनची इलेक्ट्रीक कार बनवणारी ही भारतातील पहिली फॅसिलिटी असेल. भारत हे इलेक्ट्रीक कारच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्यामुळे भारतामध्ये उत्पादीत झालेली इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये आणण्याचा आमचा मानस आहे असं कंपनीने माध्यमांना संबोधित करताना माहिती दिली आहे. परिणामी या कारबद्दल आता भारतात उत्सुकता वाढली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Triton EV Model H Price In India after model presented in India.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Auto(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या