22 January 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Bhulekh Mahabhumi | तुमच्या गावच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

Bhulekh Mahabhumi, Plot Map, Online

मुंबई, ०१ मार्च: ग्रामीण भागात म्हणजे तुमच्या गावाकडे जमिनीची कागदपत्रं मिळवायची म्हणजे मोठी डोके दुखी असते. त्यात भावकीतल्या भांडणांमुळे तसेच तक्रारींमुळे शेत जमिनीची तसेच घरांची कागदपत्र मिळवताना मोठा मानसिक त्रास होतो. आपल्या मालकीच्या जमिनीची नेमकी हद्द कोणती तेच समजणं कठीण झालं आहे. त्यामुळे कुटुंबात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

गावाकडील शेतात अगदी जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तुमच्या जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

  1. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.

  1. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
  2. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.
  3. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.
  4. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
  5. त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.
  6. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.


आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया.

  1. या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
  2. इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
  3. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
  4. आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
  5. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

 

  1. ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.
  2. यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
  3. त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.
  4. आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

ई-नकाशा प्रकल्प काय?

  1. भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.
  2. पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला आहे.
  3. या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे.
  4. त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.

 

News English Summary: The farmer needs to have a map of his land if he wants to build a new road to get to the village farm or to know the boundaries of the land. Now the government has started making the land map available online with Satbara and Aath-A transcripts. For this, we will now look at the detailed information on how to draw a map of the village and agricultural land, how to read it and what the e-map of the government is.

News English Title: Bhulekh Mahabhumi how to see map of your plot online on Maharashtra state government portal news updates.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x