खुशखबर | डिजिटल 7/12 तुमच्या मोबाईलवर असा डाउनलोड करा - नक्की वाचा

मुंबई, २८ जून | आजच्या या लेखामध्ये डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर डिजिटल सात बारा म्हणजे काय हे समजावून घेवूयात. मित्रांनो तुम्ही जर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर गेलात तर या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारचे सात बारा व ८ अ उतारे बघू शकतात. पहिला आहे विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ . दुसरा आहे digitally signed 7/12 या दोन्ही मधला फरक या ठिकाणी बघुयात.
* विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ:
बऱ्याच वेळेस आपण महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर जाऊन विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ बघतो. जिल्हा निवडला, तालुका निवडला, गाव निवडले, गट क्रमांक टाकले कि लगेच पटकन हा सातबारा किंवा नमुना नंबर ८ अ आपल्याला बघावयास मिळतो. पण जर का तुम्ही बारकाईने या 7/12 चे निरीक्षण केले तर लाल रंगामध्ये एक स्पष्ट सूचना दिलेली असते कि सदरील सात बारा हा शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे ह्या 7/12 व 8 अ चा शासकीय कामासाठी आपल्याला उपयोग करता येत नाही. या 7/12 चा उपयोग केवळ माहिती मिळविण्यासाठी आपण करू शकतो.
* डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ):
विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ सात बारा व ८ अ च्या तुलनेत डिजिटल सात बारा म्हणजेच digitally signed 7/12 खूप उपयोगी असतो. हा सातबारा मिळविण्यासाठी नोंदणी करून लॉगइन आय. डी. आणि पासवर्ड मिळवावा लागतो. १५ पेमेंट केल्यानंतरच हा सातबारा मिळतो. या ७/१२ वर क्यू आर कोड असतो. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीत केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही अशी सूचना देखील या सात बारावर असते.
* डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) मिळविण्यासाठी नोंदणी करा:
शेतकरी बंधुंनो खाली काही स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या स्टेप्स बघून तुम्ही हा सात बारा काढू शकता. सात बारा डाउनलोड करण्यासाठी अगोदर नोंदणी करावी लागते ती क्रिया या ठिकाणी समजून घेवूयात.
* तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबईलमधील ब्राउजर उघडा
* त्यामध्ये https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हा web address टाका
* एंटर बटन दाबल्यानंतर digitally signed 7/12 व 8 अची महाराष्ट्र शासनाची वेबसाईट तुमच्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.
* स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसत असलेल्या चौकटीमध्ये लॉगीन आयडी, पासवर्ड टाकून आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
* तुम्ही नवीन युजर असाल तर लॉगीन या बटनाच्या खाली दिसणाऱ्या New User registration या बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
* नोंदणी करून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवा.
खात्यामध्ये पैसे जमा करा:
* लॉगीन केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करा.
* पैसे जमा करण्यासाठी Recharge Account या बटनावर क्लिक करा.
* १५ रुपये ते १००० रुपयापर्यंत जेवढी रक्कम तुम्हाला टाकायची असेल तेवढी तुम्ही टाकू शकता.
* रकमेचा आकडा टाकल्यानंतर पे नाऊ ( Pay Now ) या बटनावर क्लिक करा.
* रिफंड पोलिसीसमोरील बटनावर टिक करा
* कन्फर्म या बटनावर क्लिक किंवा टच करा.
* जसे हि तुम्ही कन्फर्म या बटनावर क्लिक कराल त्यावेळी पेमेंट करण्याचे अनेक पर्याय तुम्हाला दिसेल त्यापैकी योग्य तो पर्याय निवडा.
* पेमेंटचा पर्याय निवडून तुमच्या डिजिटल सात बारा खात्यामध्ये पैसे जमा करा.
* पेमेंट यशस्वी झाल्यानंतर Bank Reference ID व Payment ID सांभाळून ठेवा किंवा प्रिंट काढून घ्या.
असा करा डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) डाउनलोड
* खात्यामध्ये पुरेसे पैसे जमा झाल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा, सर्वे नंबर टाका
* वरील सर्व माहिती टाकल्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक करा.
* जसे हि तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या खात्यामधून डिजिटल सातबारा किंवा डिजिटल नमुना नंबर ८ साठी प्रत्येकी १५ रुपये एवढी रक्कम कपात केली जाईल जी कधीही रिफंड होणार नाही.
* डिजिटल सात बारा अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
* डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) नमुना डाउनलोड करा:
अशा प्रकारे तुम्ही डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढून शासकीय कामासाठी देवू शकता अशी सूचना या सातबाऱ्यावर तुम्हाला वाचण्यास मिळेल. या सातबाऱ्यावर क्यू आर कोड देखील असतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: How to download digital Saat Bara Utara from Maharashtra state Bhulekha website news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल