4 January 2025 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Bhulekh Mahabhumi | प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) ऑनलाईन कसं काढायचं?

How to download, land property cards, online, Bhulekha website

मुंबई, ०३ मार्च: केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांसाठी स्वामित्व योजना आणली आहे. या योजनेविषयी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं, “स्वामित्व योजना आता देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाणार असून यामुळे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या घराचं आणि जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे.

पण, प्रॉपर्टी कार्ड नेमकं काय असतं? (What is property card exactly)

प्रॉपर्टी कार्ड (Property Card):
ज्यापद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

म्हणजे काय तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गावांचं ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वामित्व योजनेमुळे गावागावातील सामान्य नागरिक आत्मनिर्भर होणार आहे. पुढच्या तीन ते चार वर्षांत देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल.

प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं?

  1. मिळकत पत्रिका काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  3. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.
  4. DOWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD – असं या पेजचं शीर्षक आहे.

आता डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं, याची माहिती पाहूया.

 

  1. प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला या पेजवर लॉग-इन करायचं आहे.
  2. सातबारा काढताना वापरलेलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता.
  3. पण, जर तो लक्षात नसेल तर फोन नंबर टाकूनही तुम्ही प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता.
  4. ते कसं तर त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  5. त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  6. एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.
  7. याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTPच्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.
  8. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  9. पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

  1. यातल्या Digitally signed Property card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  2. त्यानंतर “डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड” नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  3. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा आणि मग तुमचं गाव किंवा प्रॉपर्टी ज्या तहसील अंतर्गत येते ते कार्यालय निवडायचं आहे.
  4. त्यानंतर गाव निवडायचं आहे आणि मग CTS नंबर टाकायचा आहे.
  5. CTS म्हणजे सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात.
  6. पण, जर तुम्हाला CTS नंबर माहिती नसेल प्लॉट नंबर तुम्ही इथं टाकू शकता.
  7. त्यानंतर CTS नंबर निवडा या पर्यायावर क्लिक केलं की तो नंबर तिथं आलेला दिसेल. त्या नंबरवर क्लिक करून तो निवडायचा आहे.
  8. सगळ्यात शेवटी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  9. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल.

प्रॉपर्टी कार्ड कसं वाचायचं?

  1. मालमत्ता पत्रक असं या कार्डचं शीर्षक असतं. यात सुरुवातीला गाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर नगर भूमापन क्रमांक किंवा प्लॉट नंबर आणि त्याचं क्षेत्र किती आहे ते चौरस मीटरमध्ये दिलेलं असतं.
  2. त्यानंतर हा प्लॉट कुणाच्या नावे आहे ती माहिती हक्काचा मूळ धारक या पर्यायासमोर दिलेली असते.
  3. त्यानंतर सगळ्यात खाली एक सूचना दिलेली असते. त्यात कोणत्या सरकारी अधिकाऱ्यानं कार्डवर सही केली आहे, त्याची माहिती सांगितलेली असते.
  4. उदाहरणार्थ – “हे मालमत्ता पत्रक दुष्यंत विश्वास कोळी यांनी 28-09-2020 या दिवशी डिजिटली साईन केले आहे.”
  5. डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येईल, असं सरकारी अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
  6. “आता प्रॉपर्डी कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही. स्थावर मालमत्तेवर होणाऱ्या व्यवहाराची नोंद प्रॉपर्डी कार्डवर ठेवली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातल्या 1165 गावांचा ड्रोन सर्व्हे झाला असून, राज्यातल्या सगळ्या गावांमधील ड्रोन सर्व्हे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सामान्य माणूस बँकांकडून कर्जही घेऊ शकेल,” असंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: The central government has introduced an ownership scheme for ordinary citizens. Introducing the budget for the scheme, Union Finance Minister Nirmala Sitharaman said, “The ownership scheme will now be rolled out in all the states across the country, giving rural citizens their home and land property cards.

News English Title: How to download land property cards online through Bhulekha website news updates.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x