23 February 2025 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

Bihar Assembly Elections 2020 | बिहारमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर

Bihar Assembly Election 2020, Election Commission of India, Bihar Elections, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होईल. यापैकी पहिल्या टप्प्यांत ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात अनुक्रमे २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर १० नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होईल.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमधील मतदारांची संख्या ६.७ कोटीवरून ७.२ कोटीपर्यंत वाढली आहे. यामध्ये ३.७९ कोटी पुरुष आणि ३.३९ कोटी महिलांचा समावेश आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच कोरोनापासून सुरक्षेसाठी सहा लाख फेस शील्डचा वापर करण्यात येईल. कोरोना रुग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी:
करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली आहे. “सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख फेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था करण्यात आली,” असल्याची माहिती सुनील अरोरा यांनी दिली.

करोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करता येणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

News English Summary: Bihar Legislative Assembly Elections 2020 will be held in three phases on October 28, November 3 and 7. The counting of votes and the results will be declared on November 10. The Election Commission said the polls will be held in less phases this year to minimize the movement of security personnel, to ensure their wellbeing as well as due to the Covid-19 pandemic. With this announcement, the Model Code of Conduct comes into force in the state. Bihar’s 243-member Assembly is set to expire on October 29, 2020.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Dates Announced by Election Commission of India Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x