गर्दी होतं नसल्याने भाजपच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांवर लहान मुलं | फडणवीस होते उपस्थित
मुंगेर , १८ ऑक्टोबर : बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोकजनशक्ती पक्ष बाहेर पडला असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. लोकजनशक्ती आता ‘एनडीए’त नसल्याने मोदींच्या छायाचित्रांचा वापर निवडणूक प्रचारासाठी न करण्याची ताकीद भाजपने दिली होती. त्यावर चिराग यांनी ‘मोदी माझ्या हृदयात वसतात’ असे विधान केले. मात्र चिराग यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका न करता बिहारचे मुख्यमंत्री नितीशुकमार यांना लक्ष्य बनवले. मोदींचे छायाचित्र लावण्याची खरी गरज मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आहे. त्यांनी नेहमीच मोदींचा अपमान केला, राजकीय विरोधही केला आहे, असेही चिराग म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील प्रचार दौऱ्याची सुरुवात २३ ऑक्टोबरला होत असून चार दिवसांत ते १२ प्रचारसभा घेतील. २३ व २८ ऑक्टोबर, १ व ३ नोव्हेंबर अशा चारही दिवशी मोदींच्या प्रत्येकी तीन सभा होतील.
दुसरीकडे बिहार निवडणुकीसाठी राज्यात रणधुमाळी सुरू आहे. कोरोनाकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. पण, अनेक ठिकाणी व्हर्च्युअल नाही तर मैदानातल्या जाहीर सभाही भरवल्या जात आहेत. ‘नवभारत टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंगेर जिल्ह्यात दोन सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दोन्ही सभांमधलं चित्र परपस्परविरोधी होतं.
यातील पहिली सभा मुंगेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रणब यादव यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव आणि खासदार ललन सिंह हेदेखील उपस्थित होते. तर इथून काही किलोमीटर अंतरावर तारापूरमध्ये विरोधी नेते तेजस्वी यादव यांची सभा भरली होती.
मुंगेर शहरापासून काही अंतरावर भाजप आणि जेडीयूचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते. परंतु,रॅलीला फारशी गर्दी आढळून आली नाही. जवळपास १००० लोकंही या सभेत नव्हती. मागच्या बाजुच्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. अनेक खुर्च्या मांडल्याही गेल्या नव्हत्या. मांडलेल्या खुर्च्यांवर मोदींचा मुखवटा घातलेली अनेक लहान मुलंही बसलेली पाहायला मिळाली.
दुसरीकडे, भाजपच्या सभेपासून ४० किलोमीटर अंतरावर तारापूरमध्ये महाआघाडीचे उमेदवारी तेजस्वी यादव मतं मागण्यासाठी दाखल झाले होते. तेजस्वी यांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी जमा झाली होती. परंतु, सभेसाठी हजर झालेल्या अनेकांनी मास्क परिधान केले नव्हते. ‘सोशल डिस्टन्सिंग’चा कुठेही थांगपत्ता नव्हता. तेजस्वी यांना पाहण्यासाठी लोकांनी आसपासच्या अनेक घरांच्या छतावरदेखील गर्दी केली होती. निर्धारीत वेळेपेक्षा जवळपास दोन तास उशिरानं तेजस्वी इथं दाखल झाले. परंतु, त्यांना पाहण्यासाठी लोकांनी तळपत्या उन्हात एवढा वेळ वाटही पाहिली. सभेत दाखल झाल्यानंतर तेजस्वी यांनी १० मिनिटांचं भाषण दिलं.
News English Summary: The battle for Bihar elections is on in the state. Leaders of all parties are fighting different tactics to reach out to the masses in the Corona era. However, in many places public meetings are being held, not just virtual ones. According to the Navbharat Times, two public meetings were held in Munger district on Saturday. The picture between the two meetings was contradictory. The rally was not very crowded. About 1,000 people were not present. The back chairs were empty. Many of the chairs were not even laid out. Many children wearing Modi’s mask were also seen sitting on the chairs.
News English Title: Bihar Assembly Election 2020 empty chairs in BJP rally New Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO