17 April 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

बिहारमध्ये आज एनडीएची बैठक | नीतीशकुमारांची निवड होणार की?

Bihar Assembly Election 2020, NDA meeting, Chief Minister Nitish Kumar

पाटणा, १५ नोव्हेंबर: बिहार निवडणुकीचा निकाल (Bihar Assembly Election 2020 Result) लागल्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या दिशेने आज (रविवार) महत्वाचा दिवस आहे. आज बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची (NDA Meeting) बैठक होणार आहे. दुपारी 12:30 वाजता नितीशकुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी बैठक होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीत नितीशकुमार यांना एनडीएचे नेते (Selecting Nitish Kumar as leader of NDA) म्हणून निवडले जाऊ शकते.

एनडीएमध्ये भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, हिंदुस्थानी अवाम मोर्चा, विकास इंसान पार्टी (व्हीआयपी) या 4 पक्षांकडून विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे. बैठकीपूर्वी या सर्व पक्षांची स्वतंत्र बैठक होणार आहे. सर्व पक्षांचा नेता निवडल्यानंतर एनडीएचा नेता निवडला जाईल. एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नितीशकुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे. यानंतर नितीशकुमार राज्यपाल यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.

दरम्यान, नितीशकुमार यांनी निवासस्थानी झालेल्या बैठकीतील माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले, की मंत्रिमंडळात सर्व घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याबाबत आणि विधानसभेच्या अध्यक्षनिवडीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, भारतीय जनता पक्षाकडून अतिमागास जातीतील किंवा अनुसूचित जातीतील एकास उपमुख्यमंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, त्यास दुजोरा मिळाला नाही.

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

 

News English Summary: Today (Sunday) is an important day for the formation of a new government after the Bihar election results. The NDA Legislative Party will meet in Bihar today. The meeting will be held at 12:30 pm at Nitish Kumar’s official residence. In this meeting of the Legislative Party, Nitish Kumar can be elected as the leader of the NDA.

News English Title: Bihar Assembly Election 2020 NDA meeting over selection Chief Minister name news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या