27 January 2025 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

VIDEO | दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळतात | पंजाबमध्ये मोदी, अदानी-अंबानींचे पुतळे जाळले - राहुल गांधी

Bihar Assembly Election 2020, Rahul Gandhi, Narendra Modi, Agriculture Bill

पश्चिम चंपारण्य, २८ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत असताना उर्वरित टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराच्या तोफा चांगल्याच तापल्या आहेत. पश्चिम चंपारण्य येथे झालेल्या जाहीरसभेत सभेत कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. “काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?,” असा सवाल राहुल गांधी यांनी मतदारांना केला.

राहुल गांधी यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह पश्चिम चंपारण्य येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले,”एरवी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. पण यावेळी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानींचे पुतळे जाळण्यात आले. या दसऱ्याला संपूर्ण पंजाबात नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचे पुतळे जाळले गेले. ही वाईट गोष्ट आहे, पण शेतकरी त्रस्त आहे म्हणून हे घडलं आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

 

News English Summary: The farmer unions across Malwa belt in Punjab marked the festival of Dussehra by burning effigies of Prime Minister Narendra Modi, corporate companies and multi-national companies in protest against the Central government’s three contentious farm laws. Bhartiya Kisan Union (Ekta Ugrahan) activists, including farmers, women, children, youths, elderly, labourers, artists and writers, participated in effigy-burning processions across the Malwa districts in the state in huge numbers.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Rahul Gandhi Narendra Modi Farmer Bill Agriculture Bill Unemployment News Updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x