21 April 2025 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

उद्या बिहार निवडणूक निकाल | घोडेबाजाराच्या शक्यतेने आरजेडी आणि काँग्रेस सतर्क

Bihar Assembly Election 2020, vote courting, Mahagathbandhan, RJD and Congress

पाटणा, ९ नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ३ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच एक्सिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll) समोर आले. प्रसिद्ध झालेल्या एक्सिट पोलनुसार महाआघाडीला मोठी आघाडी मिळताना दिसत असून एनडीए पायउतार होण्याचे संकेत मिळले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूची धाकधूक वाढली आहे.

एनडीए आणि महाआघाडीमध्ये (NDA and MahaGathBandhan) मोठी चुरस होणार असल्याने बहुमताचा १२२ चा आकड्याच्या जवळपास एनडीए गेल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी आरजेडी आणि काँग्रेस सर्तक झाले असून निवडून येणाऱ्या आमदारांना विजयी मिरवणुका न काढता खबरदारीचा उपाय म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांना पाटणातील एका हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

त्यासाठी काँग्रेसनं आधीच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे दोन नेते सध्या पाटण्यात मुक्कामी थांबले असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानं एनडीएमध्ये चलबिल सुरू झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे घोडेबाजारीची तयारी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महाआघाडी सतर्क झाली आहे. काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडे आणि रणदीप सुरजेवाला यांना निकालानंतर बिहारमध्ये निर्माण होणारी राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी आधीच पाटणाला पाठवलं आहे.

 

News English Summary: Exit polls for Bihar Assembly polls According to the released exit polls, the grand alliance is gaining ground and there are indications that the NDA is stepping down. This has increased the pressure on the Bharatiya Janata Party and the JDU.

News English Title: Bihar Assembly Election 2020 vote courting Mahagathbandhan alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या