27 December 2024 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एनडीएच्या अडचणी वाढविणार | सविस्तर वृत्त

Bihar Assembly Elections 2020, Shivsena, NCP party, NDA

पाटणा, ९ ऑक्टोबर : महाराष्ट्र निवडणुकीनंतर एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेने आता बिहार विधानसभा निवडणुकीत उडी घेण्याचे ठरवले आहे. यामुळे एनडीएतील भाजप आणि जनता दल बिहार निवडणुकीत एकेकाळी ‘एनडीए’ सहभागी असलेल्या शिवसेनेनंही एन्ट्री घेतलीय. बिहार विधानसभेच्या रणसंग्रामात शिवसेनेचे ५० उमेदवारी रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील बिहारमध्ये दाखल होणार आहेत. शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांची एक यादीही निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.

बिहारसाठी शिवसेनेचे २२ स्टार प्रचारक:
शिवसेनेकडून गुरुवारी २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशिवाय राज्यसभा खासदार संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत, गुलाबराव पाटील, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने यांचा या यादीत समावेश आहे.

महाराष्ट्राबाहेर फारसा जम नसलेल्या शिवसेनेकडून आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार आणि गोवा इथल्या निवडणुकांत भाग घेतलाय. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागांपैंकी केवळ ५० जागांवर शिवसेनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून जवळपास महाराष्ट्राचे जवळपास ६० नेते बिहार निवडणुकीत प्रचार करताना दिसणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांचा या नेत्यांत समावेश आहे.

भाजपला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीची रणनिती तयार:
बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करतील. राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी शरद पवारांसहित ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: The Shiv Sena, which exit from the NDA after the Maharashtra elections, has now decided to jump into the Bihar Assembly elections 2020. As a result, BJP and Janata Dal in the NDA have also entered the Bihar elections. It has been announced that 50 candidates of Shiv Sena will enter the fray in the battle of Bihar Assembly. Shiv Sena president and Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray himself, his son and Maharashtra Tourism Minister Aditya Thackeray will also be in Bihar to campaign for the candidates.

News English Title: Bihar Assembly Elections 2020 Shivsena and NCP party will contest Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x