Electricity OFF | बिहारमध्ये प्रचारासाठीच मुंबई वीजघात? | नितीन राऊतांची शंका खरी?
पाटणा, १६ ऑक्टोबर : मुंबईमधील (१२ ऑक्टोबर) खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करेपर्यंत संध्याकाळ झाली होती. २००० मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी देखील दिली होती. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले होते, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उच्चस्तरीय बैठक घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.
दरम्यान केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार असून अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे असेही केंद्रीय उर्जा मंत्री आर.के.सिंग म्हणाले आहेत. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात त्यादिवशी सकाळी अचानक वीज गेली होती. बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागातही वीज नव्हती. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाला होता. मुंबईतील मोठ्या भागातील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. मात्र दुसऱ्या दिवशी राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी यात घातपात असण्याची शक्यता वर्तवली होती.
त्यात सुशांत सिंह प्रकरणानंतर आता मुंबईत खंडित झालेला वीजपुरवठाही प्रचाराचा मुद्दा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांच्या सोमवारी झालेल्या प्रचारसभेत “मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा” अशा घोषणा देण्यात आल्या. बिहारमधील सत्ताधारी मंत्री या विषयाला अनुसरून थेट प्रचार करत आहेत. त्यामुळेच मुबई आणि महाराष्ट्रात केंद्रित प्रचाराचा मुद्दा बिहारमध्ये निर्माण कारण्यासाठी तर इकडे षढयंत्र रचलं गेलं नाही ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. काय ट्विट केलं होतं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी?
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
बिहारमधील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या संजय झा यांनी मुंबईतील पॉवर ब्रेकडाऊनवर सोशल मिडीयावर फिरत असलेल्या एक मजेशीर मेसेज वाचून दाखवला. यानंतर सभेच्या ठिकाणी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे बिहार निवडणुकीच्या आगामी प्रचारातही नितीश कुमार आणि भाजपकडून “मुंबई कार्ड” वापरले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई में बत्ती गुल बा।
बिहार में लाइट फुल बा।ई का बा 🙄#MumbaiPowerFailure #Mumbaipowercut pic.twitter.com/3RmJyQmrLp
— Sanjay Kumar Jha (@SanjayJhaBihar) October 13, 2020
यापूर्वी बिहारच्या राजकारणात भाजपकडून अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा पद्धतशीरपणे वापर करण्यात आला होता. राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या तपासावर लक्ष्य करत मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. यानंतर बिहार पोलिसांनीही मुंबई पोलिसांच्या तपासात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. यावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
बिहार में दू ठो एम्स बा,
पटना वाला चलs ता,
दरभंगा वाला केर कैज़ शुरू भs गेलैत अछि!
बिहार में सब कुछ बा!#बिहार_में_ई_बा pic.twitter.com/qOkQ1Wk22I
— BJP Bihar (@BJP4Bihar) October 13, 2020
आगामी काळातही प्रचारसभांमध्ये सुशांत सिंह प्रकरणाचा मुद्दा चर्चेच राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून बिहार विधानसभा निवडणुकीची धुरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परिणामी आगामी काळात मुंबई विरुद्ध बिहार असे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही बिहारमधील काही जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते प्रचारासाठी बिहारमध्ये जाणार आहेत.
News English Summary: on Monday, the entire Mumbai electricity went down due to grid failure. There was an outcry over this. Millions of passengers traveling by local train were stranded at the stations. Examinations of Mumbai University had to be postponed. Meanwhile, Sanjay Jha, the Water Resources Minister in the Bihar government, has taken a dig at the Mumbai power cut. He tweeted, ‘Batti Gul Ba in Mumbai, Light Full Ba in Bihar. Ba of e? Let me tell you that the bugle of assembly elections in Bihar is over. The nomination phase continues. The ruling NDA, led by Nitish Kumar, consistently claims that the power situation in Bihar has improved significantly in the last 15 years.
News English Title: Batti gul ba in Mumbai light full Ba in Bihar announcement in Bihar campaign News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार