22 January 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

भ्रष्टाचाराचे आरोप | सरकार स्थापनेच्या तिसऱ्याच दिवशी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा

Bihar Education Minister Mewa Lal Choudhary, Resigns

पाटणा, १९ नोव्हेंबर: नितीश कुमार मंत्रिमंडळात नुकताच पार पडलेल्या शपथविधीत जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना ( Education Minister) अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. ६३ वर्षीय जेडीयू नेते डॉ. मेवालाल चौधरी (JDU Education Minister Mewalal Chaudhary Resign) यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

मंत्रीपदाचा राजीनामा देताना मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरही दिले आहे. कोणताही खटला तेव्हा सिद्ध होतो, जेव्हा तुमच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. माझ्या विरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्ह्याची नोंदही झालेली नाही.

दरम्यान, या अगोदर बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी देखील, सहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीस शिक्षणमंत्री बनवण्यात आल्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर निशाणा साधला होता. ”दुर्देवं पहा जे भाजपावाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते, आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगलं आहे.” असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं.

मेवालाल चौधरी २०१५ साली पहिल्यांदाच जदयूकडून आमदार झाले होते. याआधी ते शिक्षकाची नोकरी करत होते. विद्यापीठाचे कुलगुरू असतानच्या काळात त्यांनी २०१२ साली सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ वैज्ञानिकांच्या पदांच्या भरतीसाठी पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर २०१७ साली याप्रकरणी सबौर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता आणि आजवर त्यांच्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही.

 

News English Summary: Bihar’s Education Minister, who took charge in the recent swearing-in of Nitish Kumar’s cabinet, has finally resigned. 63-year-old JDU leader Dr. JDU Education Minister Mewalal Chaudhary has resigned following allegations of corruption.

News English Title: Bihar Education Minister Mewa Lal Choudhary ultimately resigns News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x