22 November 2024 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सुशांत प्रकरण: मुंबई पोलिसांवर टीका आणि CBI तपासावर शांत झालेले DGP अखेर जेडीयूत

Former Bihar DGP Gupteshwar Pandey, Joins JDU, Chief Minister Nitish Kumars, Bihar Assembly Election 2020

पटना, २७ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारच्या राजकारणात आज अधिकृतरित्या प्रवेश केला. पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये आज प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या घरी जाऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून पांडे चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी बोललं जात होतं.

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. ते एनडीएचे उमेदवार म्हणून राजकीय मैदानात आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे. याआधी गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते.

“तत्पूर्वी माझं फायनल झालं की तुम्हाला सांगतो” असं म्हणत त्यांनी काही प्रश्न अनुत्तरित ठेवले होते. मात्र बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जेडीयूतील प्रवेशामुळे पांडेंचा निवडणूक लढवण्याचा मनसुबा उघड झाला आहे.

गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सातत्याने चर्चा सुरु होत्या. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपची कड घेणाऱ्या पांडेंवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने निशाणाही साधला होता. आता मात्र भाजपशी युती असलेल्या जेडीयूत प्रवेश करुन पांडेंनी चकवा दिला.

 

News English Summary: Former Bihar DGP Gupteshwar Pandey, who has recently taken voluntary retirement from his service, has joined Janata Dal (United) on Sunday after repeatedly claiming that he wouldn’t be joining politics. On Saturday, Pandey met chief minister Nitish Kumar at the party office and again dismissed speculations over his joining politic. After being the centre of the Maharashtra police versus Bihar police controversy in the investigation into Sushant Singh Rajput death case, his sudden decision to retire from his services triggered speculations.

News English Title: Former Bihar DGP Gupteshwar Pandey Joins JDU Chief Minister Nitish Kumars Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x