5 November 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
x

बिहार | आमदार फुटणार जेडीयूचे | पण ऑपरेशन होणार लोटसचं | १७ आमदार संपर्कात

JDU 17 MLAs, Join RJD, RJD leader Shyam Rajak

पाटणा, ३० डिसेंबर: बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा आली. त्यानंतर इच्छा नसतानाही नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र निवडणुकीच्या निकालाअंती सर्वात मोठा पक्ष ठरला तो लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष.

आज बिहारमध्ये एनडीएची सत्ता असली तरी भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या जेदयुचे आमदार भाजपसोबत पटत नसल्याने प्रचंड नाराज आहेत. विशेष म्हणजे आरजेडीने जिंकलेल्या एकूण जागा आणि त्यांना मिळालेली द्वितीय क्रमांकाची मतं लक्षात घेता लोकसभेत देखील तेजस्वी यादव याच तेज दिसणार याची बिहारमधील राजकीय पक्षांना चुणूक लागली आहे. त्यामुळे अनेकांचा आरजेडीकडे डोळा लागला असून लवकरच आरजेडी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.

कारण नितीश कुमार यांचं सरकार त्यांच्याच पक्षातील १७ आमदार पाडू इच्छित आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट राजदच्या नेत्याने केला आहे. हे १७ आमदार भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराज असून, राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षात दाखल होतील, असं या नेत्यानं म्हटलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी हा दावा केला आहे. संयुक्त जनता दलाचे १७ आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि लवकरच राजदमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. “जदयूचे आमदार भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीमुळे नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपामुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना तुर्तास त्यांना थांबण्यात आलं आहे,” असं रजक यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Rashtriya Janata Dal leader and former minister Shyam Rajak has made this claim. Rajak has claimed that 17 MLAs of the Samyukta Janata Dal are in touch with him and are willing to join the RJD soon. “The JD (U) MLA is unhappy with the working style of the Bharatiya Janata Party. Therefore, the NDA government led by Nitish Kumar in Bihar is ready to step down. These 17 MLAs are willing to join RJD as they are unhappy with BJP. But they have been stopped immediately, ”said Rajak.

News English Title: JDU 17 MLAs may join RJD soon says RJD leader Shyam Rajak news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x