केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण
नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतात देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. या घातक आजरामुळे आतापर्यंत बर्याच लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींबरोबरच काही केंद्रीय मंत्रीदेखील या आजाराला बळी पडले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत: स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जे लोकं माझ्या माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वत:ची तपासणी करुन घ्यावी. ही विनंती.
Union Minister Smriti Irani has tested positive for #COVID19 pic.twitter.com/6aXnqogZ1t
— ANI (@ANI) October 28, 2020
कोरोनाचा विळखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळालाही बसला आहे. गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता. तसेच अन्य मंत्र्यांनादेखील कोरोना झाला होता. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याशिवाय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी कोरोनाची लागण झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनाही कोरोनाची लागण झाली आहे.
News English Summary: Union Minister Smriti Irani on Wednesday said she has tested positive for the coronavirus. “It is rare for me to search for words while making an announcement; hence here’s me keeping it simple – I’ve tested positive for #COVID and would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest,” she wrote.
News English Title: Union Minister Smriti Irani Tests Positive For Coronavirus News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो