20 April 2025 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं भाजपने तसा निर्णय घेतला | दरेकरांचं वक्तव्य

Nitish Kumar, Shivsena, Pravin Darekar

मुंबई, १६ नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाअंती एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्या होता. राज्यात आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरून भारतीय जनता पक्ष द्वितीय स्थानी तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्ष कोणता निर्णय यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. मात्र त्यानंतर भाजपवर उलटी टीका होऊ लागली असून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत आडमुठी भूमिका घेतल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. परिणामी भाजपच्या नेत्यांकडून यावर स्पष्टीकरण येण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या भारतीय जनता पक्षानं नितीश यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवलं आहे. बिहारमधील घडामोडींवरून आता महाराष्ट्रात टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला. परंतु महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये आज नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडतो आहे. सलग चौथ्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर बोलत होते. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता, ‘बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं पक्षानं तसा निर्णय घेतला आहे. त्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही. महिलांचे प्रश्न समजून घेता यावेत म्हणून महिलेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं आहे,’ असं देखील प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: The NDA had bagged the highest number of seats in the Bihar Assembly elections. The RJD was the second largest party in the state, followed by the Bharatiya Janata Party (BJP) and Nitish Kumar’s Samyukta Janata Dal (SJD). But after that, everyone was watching the decision of the Bharatiya Janata Party. However, in the NDA meeting, it was decided that Nitish Kumar would be the Chief Minister. However, after that, the BJP has been criticized and in Maharashtra, it has been said that the Bharatiya Janata Party has taken a side role with the Shiv Sena. As a result, explanations have started coming from BJP leaders.

News English Title: We promised Nitish Kumar not to Shivsena said BJP MLA Pravin Darekar News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या