22 November 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Actor Irrfan Khan Biography | अभिनेता इरफान खान यांचा जीवन परिचय

Actor Irrfan Khan Biography

मुंबई, १३ सप्टेंबर | अभिनेता इरफान खानने हिंदी भाषेसह अनेक इंग्रजी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त, इरफानचे लाखो चाहते जगभरात पसरलेले आहेत. इरफान खान हा दिसण्यामध्ये एवढा काही सुंदर नाही, परंतु आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आज तो एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे आणि जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्याचे नाव समाविष्ठ झालेले आहे.सध्या प्रत्येकाला इरफानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि आज आम्ही त्याचे आयुष्य तुमच्यासमोर आणणार आहोत.

Actor Irrfan Khan Biography, अभिनेता इरफान खान जीवन परिचय – Actor Irrfan Khan Biography in Marathi :

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म  7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानच्या जयपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव साहबजादे यासीन अली खान आणि आईचे नाव सैदा बेगम आहे.  इरफानचे एकूण तीन भावंडे आहेत, त्यापैकी दोन भाऊ आणि एक बहिण आहे.

इरफान खान जेव्हा एम.ए. चा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. इरफान खानला लहानपणापासूनच क्रिकेटचे खूप वेड होते आणि त्यांना लहानपणी एक क्रिकेटपटू व्हायचे होते. पण कुटूंबाकडून परवानगी न मिळाल्याने त्याला आपली लाईफ लाइन बदलावी लागली. तो बालपणात एक चांगला क्रिकेटपटू देखील होता.सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्यांची निवड झाली होती.पण चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर इरफानने बरीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

इरफान खान चित्रपट करिअर:
इरफान खानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शन मालिकांमधून केली. त्याच्या सुरुवातीच्या काळात तो चाणक्य, भारत एक खोज, चंद्रकांत सारख्या मालिकांमध्ये दिसला आणि त्यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘सलाम बांबे’ या चित्रपटातून एका छोट्या भूमिकेतून झाली. यानंतर त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, इरफान खानने 1988 साली आलेल्या सलाम बॉम्बेमध्ये छोटी भूमिका साकारली होती, परंतु इरफानची ही भूमिका चित्रपटातून काढून टाकण्यात आली होती.

या चित्रपटा नंतर इरफानने बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या पण 2001 मध्ये आलेल्या ‘द वॉरियर’ या चित्रपटाने त्याचे आयुष्य बदलून टाकले आणि या चित्रपटापासून त्यांना ओळख मिळाली, हा आसिफ कपाडिया दिग्दर्शित एक ब्रिटिश चित्रपट होता ( आसिफ कापडिया).

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट दाखविला गेला होता.या चित्रपटा नंतर इरफान 2004 मध्ये आलेल्या ‘हाशील ’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता आणि त्याने हे पात्र उत्कृष्टपणे बजावले होते. या चित्रपटातून इरफान खान याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्याने काम केलेल्या काही मालिका खालीलप्रमाणे आहेत

* चाणक्य
* भरत एक खोज
* साराजहां हमारा
* बनेगी अपनी बात
* चंद्रकांत
* श्रीकांत
* स्टार बेस्टसेलर्स
* मानो या ना मानो

इरफान खान यांचे विवाहित जीवन | Marriage Life:
इरफानने त्याची मैत्रीण सुतापा सिकदारशी लग्न केले, त्यांना दोन मुले आहेत ज्यांचे नाव बाबिल आणि आर्याना आहे.असे म्हणतात की इरफान आपल्या पत्नीला drama स्कूल मध्ये भेटला. इरफानप्रमाणे सुतापासुद्धा या drama स्कूलची विद्यार्थिनी होती आणि येथून सुरु झालेली त्यांची मैत्री प्रेमात बदलली होती.

इरफान खान हॉलिवूडमध्ये | Career in Hollywood:
इरफान खान हा असा भारतीय कलाकार ज्याने भारतीय चित्रपटासोबतच परदेशी चित्रपट म्हणजे हॉलिवूडमध्येही काम केलेले आहे. इरफानने बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही उत्तम अभिनय केला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेमांमध्ये आपला ठसा उमटविणारा इरफान खान हा चित्रपटसृष्टीतील एक तारा आहे.काही हॉलीवूड चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

* सच अ लॉन्ग जर्नी(1988)
* द नेमसेक (2006)
* ए माइटी हार्ट (2007)
* दार्जीलिंग लिमिटेड (2007)
* स्लमडॉग मिलियनेयर (2008)
* लाइफ ऑफ पाई (2012)
* द अमेजिंग स्पाइडर मैन (2012)
* जुरासिक वर्ल्ड (2015)
* इन्फर्नो (2016)

गंभीर आजाराने ग्रस्त | Suffered From Cancer:
मार्च २०१८ मध्ये इरफानला त्याच्या आजारपणाविषयी कळालं होतं. त्याने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही बातमी सोशल मिडीयाद्वारे दिली होती. इरफानने ट्वीट करत लिहिलं होतं, ”आयुष्यात अचानक असं काही होतं जो तुम्हाला खुप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात गेले काही दिवस असंच काहीसं सुरु आहे. मला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला आहे. मात्र माझ्याजवळ असलेल्या लोकांचं प्रेम आणि ताकदीने माझ्यात नवी उमेद जागी केली आहे.”

इरफानला त्याच्या आजारपणाचं कारण कळताच तो त्यावर उपचार घेण्यासाठी लंडनला गेला होता. तिथे त्याने एक वर्ष उपचार केल्यानंतर २०१९मध्ये तो भारतात परत आला होता.

इरफान खान निधन | Death:
लंडनवरुन उपचार करुन आल्यानंतर इरफान अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या शूटसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्याच्या पुढच्या शेड्युलसाठी लंडनला गेला आणि तिथे गेल्यानंतर तो डॉक्टरांच्या संपर्कात देखील होता.

Irrfan khan Information in Marathi

इरफान खानचं वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं.  २८ एप्रिल 2020 रोजी अचानक प्रकृती खालावल्याने तो मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दाखल झाला होता. इरफानची तब्येत अधिकंच खालावल्याने त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं.मात्र अखेर कॅन्सरशी लढता लढता त्याचं निधन झालं.

इरफान खानला मिळालेले पुरस्कार | Awards:
* पद्मश्री पुरस्कार २०११,
* फिल्मफेअर अवॉर्ड 2003,
* फिल्मफेअर पुरस्कार 2007,
* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१२

Actor Irrfan Khan information in Marathi :

Actor Irrfan Khan was an Indian film actor and producer, majorly known for his work in Hindi cinema (Bollywood). He has also worked in British films and Hollywood. In his career of nearly 30 years, Irrfan received many awards– National Film Award and Filmfare Awards in four categories. He is referred to as one of the finest actors that Indian cinema has produced.

Irrfan Khan: Early Life, Family and Education:
Irrfan Khan was born as Sahabzade Irfan Ali Khan on January 7, 1966, in Jaipur, Rajasthan to a Muslim Pashtun family. Irrfan Khan’s mother Begum Khan hailed from the Tonk Hakim family and his father Jagiradar Khan was from Khajuriya village near the Tonk district. Irrfan Khan’s father ran a tire business and his mother was a housewife. Irrfan Khan died on April 29, 2020, at the age of 53 years due to colon infection.

Irrfan Khan was a skilled cricketer and was selected for CK Nayudu Tournament– a stepping stone to First-Class cricket for under 23 players. However, he did not turn up for the tournament owing to lack of funds.

In 1984, Irrfan Khan was doing his Master of Arts degree when he got a scholarship to study at National School of Drama (NSD) in New Delhi. When Irrfan Khan arrived in Bombay, he worked as an air conditioner repairman and one of the houses he visited to repair an air conditioner was the house of superstar Rajesh Khanna.

Irrfan Khan married Sutapa Sikdar (a Hindu Brahmin) in 1995. The couple has two sons: Ayaan Khan and Babil Khan. Sutapa is an Indian Film Producer, Dialogue Writer and Screenplay Writer. She is a part of many famous movies– Khamoshi: The Musical (Dialogue Writer, 1996), Supari (Dialogue Writer, 2003), Kahaani (Dialogue Writer, 2003), Madaari (Producer, 2016), Qarib Qarib Singlle (Producer, 2017).

Irrfan Khan: Illness and Death:
Irrfan Khan was diagnosed with an undisclosed disease in February 2018. The actor put the speculations to an end stating that he was suffering from a neuroendocrine tumour – a rare form of cancer that can target various parts of the body via his twitter handle. The same year Irrfan Khan travelled to London for the treatment.

On April 28, 2020, Irrfan Khan was rushed to Kokilaben Dhirubhai Ambani Hospital in Mumbai where he was treated for colon infection. On April 29, 2020, four days after his mother’s death in Jaipur, Irrfan Khan passed away at the age of 53.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Biography: Actor Irrfan Khan Biography in Marathi.

हॅशटॅग्स

#IrrfanKhan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x